Vastu Tips : पर्समध्ये या ३ गोष्टी ठेवताय? सावधान! आर्थिक संकटाला मिळू शकतं निमंत्रण

Things not to keep in purs : पैशांची आवक वाढावी आणि आर्थिक सुबत्ता टिकून राहावी, यासाठी पर्स स्वच्छ व व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. पर्समध्ये काही अनावश्यक वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पैशांच्या प्रवाहात अडथळे येऊ शकतात.
Simple Vastu tips Things Not To Keep In Your Wallet
Simple Vastu tips Things Not To Keep In Your Wallet saam tv
Published On: 

आपण दिवसभर आपल्यासोबत पर्स किंवा पाकीट ठेवतो. त्यामध्ये पैसे, कार्ड, महत्त्वाची कागदपत्रे यांसह अनेक छोट्या-मोठ्या वस्तू असतात. मात्र, कालांतराने पर्समध्ये अनावश्यक कागदपत्रे, जुन्या पावत्या आणि इतर वस्तूंचा साठा होतो. फेंगशुईच्या तत्त्वांनुसार पर्समध्ये अशा अनावश्यक वस्तू ठेवणे योग्य मानले जात नाही. पर्स नेहमी स्वच्छ, हलकी आणि व्यवस्थित असावी. त्यामुळे पर्समध्ये खालील तीन गोष्टी ठेवणे टाळावे, असे सांगितले जाते.

जुन्या बिलांचा आणि पावत्यांचा साठा करू नका

अनेकांना खरेदी केल्यानंतर मिळालेली बिले किंवा जुन्या पावत्या पर्समध्ये ठेवण्याची सवय असते. काही वेळा जुन्या कार्डांसह गरज नसलेले कागदही पर्समध्ये तसेच पडून राहतात. फेंगशुईनुसार, पर्समध्ये अशा अनावश्यक कागदपत्रांचा साठा करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे वेळोवेळी पर्सची स्वच्छता करावी आणि उपयोगात नसलेली बिले, पावत्या व कागदपत्रे काढून टाकावीत. असे केल्याने पर्समध्ये नीटनेटकेपणा राहतो आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.

Simple Vastu tips Things Not To Keep In Your Wallet
Health Tips : लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची खाणे अधिक फायदेशीर? जाणून घ्या, हिरव्या मिरचीचे आरोग्यदायी फायदे

फाटलेल्या किंवा जुन्या नोटा पर्समध्ये ठेवू नका

पर्समध्ये पैसे ठेवताना त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा नकळत फाटलेल्या, खराब झालेल्या किंवा जुन्या नोटा पर्समध्ये बराच काळ पडून राहतात. फेंगशुईच्या मान्यतेनुसार, अशा नोटा पर्समध्ये ठेवणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे आर्थिक अडचणी आणि पैशांच्या व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, असे मानले जाते. म्हणूनच फाटलेल्या किंवा खराब झालेल्या नोटा पर्समध्ये साठवून ठेवणे टाळावे.

औषधे पर्समध्ये ठेवणे टाळा

काही जण गरज पडल्यास लगेच वापरता यावीत म्हणून पर्समध्ये औषधे ठेवतात. मात्र, फेंगशुईच्या नियमांनुसार पर्समध्ये औषधे ठेवणे टाळावे, असे सांगितले जाते. औषधांमुळे पर्समधील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शक्यतो औषधांसाठी स्वतंत्र डबा किंवा पाउच वापरावा.

Simple Vastu tips Things Not To Keep In Your Wallet
Women Health : गर्भवती महिलांमध्ये प्रिमॅच्योर प्रसूतीचा धोका का वाढतोय? कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या

पैशांची आवक वाढण्यासाठी पर्समध्ये ठेवा या गोष्टी

  • फेंगशुईच्या मान्यतेनुसार, पर्समध्ये पैसे नेहमी व्यवस्थित ठेवावेत. तसेच पर्स पूर्णपणे रिकामी ठेवू नये, असे सांगितले जाते.

  • लाल धाग्यात बांधलेली तीन चिनी नाणी पर्समध्ये ठेवणे शुभ मानले जाते. ही नाणी पूजासाहित्य विकणाऱ्या दुकानांमध्ये उपलब्ध असतात.

  • पर्समध्ये तांदळाचे २१ दाणे ठेवणेही शुभ मानले जाते. यामुळे आर्थिक अडचणी दूर राहतात आणि धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो, अशी फेंगशुईमध्ये श्रद्धा आहे.

टीप : ही माहिती असा दावा करत नाही की या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.