Nashik : नाशिक पुन्हा हादरलं! खासगी कोचिंग क्लासमध्ये १०वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, शिक्षिकेच्या भाच्याने रूममध्ये नेलं अन्...

Nashik Crime News : नाशिकमधील पखाल रोड परिसरात कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.
NASHIK COACHING CLASS MINOR ASSAULT CASE SHOCKING CRIME POCSO INVESTIGATION
NASHIK COACHING CLASS MINOR ASSAULT CASE SHOCKING CRIME POCSO INVESTIGATIONSaam Tv
Published On
Summary
  • नाशिकमध्ये कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

  • शिक्षिकेच्या मदतीने भाच्याने गुन्हा केल्याचा आरोप

  • पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; आरोपी फरार

  • या घटनेमुळे क्लासेसच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

नाशिकमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीत कर्मचारी महिलांवर झालेला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीवर कोचिंग क्लासमध्येच लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे. पखाल रोड परिसरातील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये हा प्रकार घडला असून, क्लासचालक महिलेच्या मदतीने तिच्याच भाच्याने विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तात्काळ गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी दहावीची असून ती नियमितपणे पखाल रोडवरील ‘कसक पार्क’ येथे क्लाससाठी जात होती. जुलै २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तिच्यासोबत अश्लील प्रकार सुरू होता. क्लासचालक राशेदा शेख हिने विविध कारणे सांगत विद्यार्थिनीला घरातील बेडरूममध्ये पाठवले, जिथे तिचा भाचा सिबतेन याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.

NASHIK COACHING CLASS MINOR ASSAULT CASE SHOCKING CRIME POCSO INVESTIGATION
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 'नो क्लिक', सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल होणार

या घटनेदरम्यान पीडितेला धमकावून गप्प बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब कुणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी भीती दाखवण्यात आली. तसेच धमकी देत तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर विद्यार्थिनीने धैर्य दाखवत मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

NASHIK COACHING CLASS MINOR ASSAULT CASE SHOCKING CRIME POCSO INVESTIGATION
Shocking : “तू मला खूश कर, मी तुला जास्त दिवस सुट्टी देईन,” नामांकित कंपनीच्या बॉसची महिला कर्मचाऱ्याकडे अश्लील मागणी

या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी क्लासचालक महिला आणि तिच्या भाच्याविरोधात बलात्कार तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच दोन्ही संशयित फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मुस्तफा शेख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

NASHIK COACHING CLASS MINOR ASSAULT CASE SHOCKING CRIME POCSO INVESTIGATION
Shocking : मुंबई हादरली! गार्डनमध्ये खेळणाऱ्या ९ वर्षीय मुलीसोबत पोलीस अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, प्राव्हेट पार्टही दाखवला

या घटनेमुळे खासगी क्लासेसमधील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नाशिकमधील ही घटना केवळ एक गुन्हा नसून समाजासाठी गंभीर इशारा मानला जात आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आणि कोचिंग क्लासेसवर अधिक कडक देखरेख ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com