Shocking : मुंबई हादरली! गार्डनमध्ये खेळणाऱ्या ९ वर्षीय मुलीसोबत पोलीस अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, प्राव्हेट पार्टही दाखवला

Mumbai Crime News : वरळी परिसरात नऊ वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
MUMBAI SHOCKER POLICE OFFICER ARRESTED IN WORLI MINOR MISCONDUCT CASE
MUMBAI SHOCKER POLICE OFFICER ARRESTED IN WORLI MINOR MISCONDUCT CASESaam tv
Published On
Summary
  • वरळीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन

  • मुलीच्या धाडसामुळे आरोपीचा पर्दाफाश

  • पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी अटकेत

  • घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप आणि मुलींच्या सुरक्षेवर प्रश्न

Mumbai Crime News : एकीकडे पुण्यातील भोरमध्ये एका चार वर्षीय मुलीवर गोठ्यात नेवून बलात्कार करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच आता मुंबईतील वरळी परिसरातून खाकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. समाजाचे रक्षणकर्ते मानले जाणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने धक्कादायक कृत्य केले आहे. दलातील वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यानेच नऊ वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन करून तिला आपले प्रायव्हेट पार्ट दाखवल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास सर पोचखानवाला रोडवरील सिंग गार्डन येथे घडली. संबंधित मुलगी नेहमीप्रमाणे गार्डनमध्ये खेळण्यासाठी गेली होती. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या उपाधीक्षक अधिकाऱ्याने मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत तिच्याशी अशोभनीय वर्तन करत तिला आपले प्रायव्हेट पार्ट दाखवल्याचा आरोप आहे. मुलीने प्रसंगावधान राखत त्या व्यक्तीच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि घरी जाऊन आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला.

MUMBAI SHOCKER POLICE OFFICER ARRESTED IN WORLI MINOR MISCONDUCT CASE
Mumbai : मुंबईत मोठा घोटाळा! SRA प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार; ED आणि SEBI कडे तक्रार दाखल

मुलीच्या आईने तात्काळ वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. तेथे मुलीने संबंधित अधिकाऱ्याची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, याच वेळी गार्डनमध्ये उपस्थित असलेल्या आणखी एका अल्पवयीन मुलाने पुढे येत काही दिवसांपूर्वी त्या व्यक्तीने त्याच्याशीही गैरप्रकार केल्याचा आरोप केला. या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी तातडीने पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला.

MUMBAI SHOCKER POLICE OFFICER ARRESTED IN WORLI MINOR MISCONDUCT CASE
Shocking : वहिनीसोबतचं अफेअर पत्नीला समजलं; पतीने प्रेयसीच्या मदतीने केली पत्नीची हत्या, थरारक घटनेने सर्वजण सुन्न

सदर अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेमुळे पोलिस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीकडूनच अशा प्रकारचे कृत्य घडल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत असून, अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com