Amrut Bharat Express : दसऱ्यापूर्वीच भारतीय रेल्वेचं मोठं गिफ्ट! महाराष्ट्रातून धावली नवी अमृत भारत ट्रेन, कुठे-कुठे थांबणार?

Amrut Bharat Express Train : नंदुरबार रेल्वे स्थानकावरुन अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. महाराष्ट्रातील १४ रेल्वे स्थानकांवर ही ट्रेन थांबणार आहे. याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
Amrut Bharat Express
Amrut Bharat Expressx
Published On
Summary
  • दसऱ्यापूर्वी नंदुरबारहून अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरु झाली.

  • महाराष्ट्रातील १४ स्थानकांवर ही ट्रेन थांबणार आहे.

  • पीएम मोदी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शुभांरभ केला.

सागर निकवडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nandurbar : दसऱ्याच्या पूर्वीच भारतीय रेल्वेने प्रवाशांना नवीन गिफ्ट दिले आहे. देशातील अद्यावत असलेली अमृत भारत ट्रेनचा आजपासून शुभारंभ होत आहे. आज (२७ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अमृत भारत रेल्वेचा हिरवा झेंडा दाखवत रेल्वेचा शुभांरभ केला.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार रेल्वे स्थानकावरून अमृत भारत अंतर्गत उधाना ब्रह्मपुर या विशेष रेल्वेला हिरवा झेडा दाखवण्यात आला आहे. ही विशेष रेल्वे गाडी महाराष्ट्रातील १४ स्थानकांवर थांबा घेणार आहे. याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे. नरेंद्र मोदी आणि अश्विनी वैष्णव यांच्या डिजिटल उपस्थितीत रेल्वे नंदुरबार स्थानकावरुन निघाली.

Amrut Bharat Express
Digital Payment होणार सोपं आणि सुरक्षित! OTP व्यतिरिक्त फिंगरप्रिंट आणि पासवर्डनेही होणार व्यवहार

गुजरातच्या उधनापासून ते ओडिशाचा ब्रह्मपुर या दिशेनेही अमृत भारत रेल्वे ही स्पेशल ट्रेन दर रविवारी धावणार आहे. ही अमृत भारत ट्रेन सुमारे ३३ तासात १७ हजार किलोमीटर धावणार आहे. महाराष्ट्रातील एकूण १४ रेल्वे स्थानकावर ही रेल्वे थांबणार आहे. महाराष्ट्रातील नंदुरबारच्या रेल्वे स्थानकावर ही नवीन रेल्वे पोहचताच लोको पायलट यांचा सन्मान करत माजी खासदार यांना गावित, माजी जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया गावित यांचा हस्ते हिरवा झेंडा दाखल नंदुरबार मधून रेल्वेला रवाना करण्यात आले.

Amrut Bharat Express
Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

ही अमृत भारत ट्रेन आठवड्यातून एकदा म्हणजेच रविवारी ओडिशाकडे मार्गस्थ होणार आहे. ओडिशापर्यत पोहचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी ही ट्रेन उपलब्ध करुन दिल्याबद्दल या परिसराच्या नागरिकांकडून डॉ. हिना गावितांनी नरेंद्र मोदींचे धन्यवाद व्यक्त केले आहे. या ट्रेनचा फायदा अनेक प्रवाशांना होणार आहे.

Amrut Bharat Express
Pune : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार, फ्रेंच कंपनीशी करार; पहिल्यांदाच सर्व महिला लोको पायलट्स असणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com