Pune : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार, फ्रेंच कंपनीशी करार; पहिल्यांदाच सर्व महिला लोको पायलट्स असणार

Pune Metro : पुणे मेट्रोतील हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर लवकरच मेट्रो धावणार आहे. या प्रकल्पासाठी फ्रेंच कंपनीशी करार करण्यात आला आहे. या मार्गावर सर्व महिला लोको पायलट्स असतील.
Pune Metro
Pune Metrox
Published On
Summary
  • हिंजवडी-शिवाजीनगर या पुणे मेट्रो मार्गिकेचे काम केओलिस ही फ्रेंच कंपनी करत आहे.

  • या मार्गिकेवर सर्व महिला लोको पायलट्स असणार आहेत.

  • मार्च २०२५ पर्यंत ही मार्गिका सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Pune Metro News : पुणे मेट्रोच्या हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचे व्यवस्थापन पॅरिसस्थित फ्रेंच कंपनी केओलिस करणार आहे. या कंपनीने पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड म्हणजेच पीआयटीसीएमआरएलसोबत करार केला आहे. २२ अल्स्टॉम कंपनीच्या मेट्रो गाड्यांची देखभाल आणि २३ स्थानकांवरील तिकीट व्यवस्था याची जबाबदारी केओलिस कंपनीकडे असेल.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कॉरिडॉरवर सर्व महिला मेट्रो पायलट ठेवण्याची घोषणा केली आहे. २३ किमी लांबीचा हा मेट्रो मार्ग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी अशा पीपीपी मॉडेलवर विकसित केले जात आहे. या मार्गिकेवर २३ स्थानके असतील. या मेट्रो मार्गावर ट्रायल रन आधीच पूर्ण झाले असून मार्च २०२५ पर्यंत सेवा सुरु होणे अपेक्षित आहे.

Pune Metro
Pune : पुणे रिंग रोडबाबत मोठी अपडेट, प्रकल्पाचा Phase 1 अंतिम टप्प्यात, PMRDA शेतकऱ्यांना भरपाई देणार

पुणे मेट्रोमधील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कॉरिडॉरचा फायदा अनेकांना होणार आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो प्रवाशांना मेट्रो मार्गिकेमुळे मध्य पुण्याशी जोडेल. या प्रकल्पाचे सुमारे ८७ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या जड बांधकामाचे बहुतांश काम अंतिम टप्प्यात आहे. सर्व काम वेळेत झाल्यास पुणेकरांना २०२६ पासून मार्गिकेवर मेट्रोन प्रवास करता येईल.

Pune Metro
Nandurbar : नंदुरबारच्या जिल्हाधिकारी महिलेचा प्रेरणादायी निर्णय; जुळ्या मुलांचं सरकारी शाळेत अ‍ॅडमिशन, VIDEO

हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात आयटी पार्कमध्ये अनेकजण कामाच्या निमित्ताने राहतात. आयटी पार्कमुळे परिसरातील वाहतुकी कोंडी होत असल्याचे पाहायला मिळते. हा त्रास कमी होण्यासाठी मेट्रोचा पर्याय उपलब्ध केला जात आहे. हिंजवडी-शिवाजीनगर पुणे मेट्रोसाठी एकूण ८,३१३ कोटी रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. यातील १,३१५ कोटी रुपये खाजगी कंपन्यांनी गुंतवले आहेत आणि ४,७८९ कोटी रुपये कर्जाद्वारे उभारले आहेत. याशिवाय केंद्र सरकारकडून १,२२४.८ कोटी आणि महाराष्ट्र सरकारकडून ९०.५८ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे.

Pune Metro
Pune : वर मेट्रो, खाली बस धावणार! पुण्यात ११ किमीचा डबलडेकर उड्डाणपूल, पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com