Pune Ring Road Project
Pune Ring Road Project x

Pune : पुणे रिंग रोडबाबत मोठी अपडेट, प्रकल्पाचा Phase 1 अंतिम टप्प्यात, PMRDA शेतकऱ्यांना भरपाई देणार

Pune Ring Road Project : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त यांनी आढावा बैठक घेतली. पुणे रिंग रोड प्रकल्पातील पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Published on
Summary
  • पुणे रिंग रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात असून लवकरच पूर्ण होणार आहे.

  • पीएमआरडीए शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी तातडीने बैठक घेणार आहे.

  • प्रकल्पामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी व अवजड वाहनांची समस्या कमी होणार आहे.

Pune Ring Road Project Update : पुणे रिंग रोड प्रकल्पाशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. पीएमआरडीए म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी प्रस्तावित पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी सुरु असलेल्या भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेतला. आयुक्तांनी अधिकाऱ्यांना जलदगतीने काम करण्याच्या सूचना दिल्या. रिंग रोड प्रकल्पातील टप्पा १ ते ४ यासाठी अधिग्रहण आणि जमीन मोजमाप करण्याचा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Pune Ring Road Project
Pune : वर मेट्रो, खाली बस धावणार! पुण्यात ११ किमीचा डबलडेकर उड्डाणपूल, पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

पुणे शहर आणि त्याच्या आसपासच्या भागातील वाहतूक कोंडीचा त्रास कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा रिंग रोड प्रकल्प चार टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. सोलू ते निरगुडी यादरम्यान पसरलेला, ३ गावांचा समावेश असलेला पहिला टप्पा भूसंपादनाच्या अंतिम टप्प्यात आहे. फ्लोअर स्पेस इंडेक्स आणि ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राइट्सद्वारे भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांसोबत तातडीने बैठक घेण्याची गरज असल्याचे डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले.

Pune Ring Road Project
MLA car accident : बुलढाण्यात आमदाराच्या कारचा भीषण अपघात, २५ वर्षाचा तरूण कोमात

पीएमआरडीए आयुक्त डॉ. म्हसे यांनी हिंजवडी आणि चाकणमधील रस्ते प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे अवजड वाहनांची वाहतूक कमी होईल असे म्हटले जात आहे. नवले पूलालगत वाहतूक व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजनांचा आढावा देखील त्यांनी घेतला. डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित विभागांना समन्वयित प्रयत्नांद्वारे ऑक्टोबरपर्यंत सर्वकामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

Pune Ring Road Project
Pune Crime : 'आम्हीच इथले भाई' म्हणत पुण्यात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, पाहा Video

पुण्यातील विविध उपक्रमांसाठीच्या आढावा बैठकीला अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, विकास परवानगी आणि नियोजन संचालक अविनाश पाटील, जमीन आणि मालमत्ता विभागाचे सहआयुक्त हिंमत खराडे, भूमी अभिलेख विभागाच्या अधीक्षक आशा जाधव, अधीक्षक अभियंता शिवप्रसाद बागडी, भूसंपादन समन्वय अधिकारी आणि पीएमसी, एनएचएआय, पीडब्ल्यूडी आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.

Pune Ring Road Project
Fire Accident : भयंकर! इलेक्ट्रिक स्कूटरचा अचानक स्फोट, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com