MLA car accident : बुलढाण्यात आमदाराच्या कारचा भीषण अपघात, २५ वर्षाचा तरूण कोमात

Maharashtra MLA car accident : बुलढाण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. आमदार किरण सरनाईक यांच्या कारला अपघात झाला असून २५ वर्षीय कृष्णा लष्कर हा युवक गंभीर जखमी होऊन कोमात गेला आहे.
MLA car accident
MLA car accidentsaam tv
Published On
Summary
  • बुलढाण्यात आमदार किरण सरनाईक यांच्या कारला अपघात झाला.

  • २५ वर्षीय कृष्णा लष्कर हा युवक गंभीर जखमी झाला असून तो कोमात गेला आहे.

  • ही घटना चिखली शहरात घडली असून परिसरात खळबळ उडाली.

  • आमदार सरनाईक हे आमदार शिंगणे यांच्याकडे सांत्वनकर भेटीस आले होते.

संजय जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

MLA Kiran Sarnayak car accident news update : बुलढाणामधील चिखली शहरात शिक्षक मतदारसंघचे आमदार किरण सरनाईक यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ वर्षीय कृष्णा लष्कर हा युवक गंभीर जखमी झाला असून, तो कोमात गेला आहे. चिखली शहरातील ही घटना असून परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातामध्ये किरण सरनाईक यांना दुखापत झाली की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आमदार सरनाईक हे आमदार शिंगणे यांच्याकडे सांत्वन भेटीसाठी आले होते, त्यावेळी हा अपघात झाला. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी युवकावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात असून, याबाबत अधिक माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

MLA car accident
Pune Firing : पुण्यात गोळीबाराचा थरार! क्षुल्लक कारणावरुन फायरिंग, निलेश घायवाळ टोळीतील चौघांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक (रा. वाशीम) यांची कार पायी चालत जाणाऱ्या कृष्णा नंदू लष्कर (वय २५, राहणार गौरक्षण वाडी चिखली) या तरुणास पानगोळे हॉस्पिटलसमोर उडवले. सकाळी दहाच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातामध्ये कृष्णा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवंजाळ हॉस्पिटल, चिखली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कृष्णा सध्या कोमात आहे.

MLA car accident
Sanjay Raut : आनंद दिघे नेते नव्हते, बाळासाहेबांच्या शेजारी त्यांचा फोटो का? संजय राऊतांचा सवाल

घटनेच्या वेळी आमदार किरण सरनाईक हे बुलढाण्यातील डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी जात होते. घटनेनंतर आमदार सरनाईक यांनी स्वतः जखमी तरुणाला कारमध्ये बसवून जवंजाळ हॉस्पिटल येथे दाखल केले. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चालकाला ताब्यात घेऊन रस्त्यावरील अपघातग्रस्त कारचा पंचनामा केला आहे. कार चिखली पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आली आहे.

MLA car accident
Pune Crime : 'आम्हीच इथले भाई' म्हणत पुण्यात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, पाहा Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com