Fire Accident : भयंकर! इलेक्ट्रिक स्कूटरचा अचानक स्फोट, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू
चार्जिंगदरम्यान ई-स्कूटरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत त्यांची १४ वर्षांची नात थोडक्यात बचावली.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.
Fire : ई-स्कूटरला लागलेल्या भीषण आगीत एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आग्रा येथे घडली आहे. या दुर्घटनेमध्ये त्यांची १४ वर्षांची नात थोडक्यात बचावली. ही आग दाम्पत्याच्या मुलाने चार्जिंगसाठी ठेवलेल्या ई-स्कूटरला लागून पसरली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. ही घटना मंगळवारी (१६ सप्टेंबर) पहाटे आग्रा येथील लक्ष्मीनगर भागात घडली आहे.
लोहामंडी पोलीस स्टेशनचे एसीपी मयंक तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना बाहेर काढले. पण भगवती प्रसाद (वय ९५ वर्षे) आणि त्यांची पत्नी उर्मिला देवी (वय ८५ वर्षे) यांचा दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. आगीत भगवती प्रसाद यांचा जागीच मृत्यू झाला, उर्मिला यांना जिवंत बाहेर काढण्यात आले, पण त्या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. दीड तासांनंतर त्यांचाही मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. तेव्हा वृद्ध दाम्पत्य आणि त्यांची नात तळमजल्यावरच्या खोलीत झोपलेले होते. आगीमुळे धुर जमा झाल्याने नात जागी झाली. मदतीसाठी ती पहिल्या मजल्यावर असलेल्या पालकांकडे धावली. आग लागल्याची माहिती मिळताच शेजाऱ्यांनीही मदतीचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत आग वेगाने पसरली होती.
भगवती प्रसाद आणि उर्मिला देवी यांचा मुलगा प्रमोद म्हणाला, 'रात्री दीडच्या सुमारास, मी ईस्कूटर तळमजल्यावर चार्जिंगवर ठेवली आणि वरच्या मजल्यावर झोपायला गेलो. माझे आईवडील तळमजल्यावर झोपले होते. आग लागल्याचे कळताच मी खाली धावलो. तोपर्यंत स्कूटरची बॅटरी आधीच फुटली होती. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. पण माझे वडील आधीच मरण पावले होते. रुग्णालयात नेत असताना माझ्या आईचे निधन झाले. स्कूटरची बॅटरी अजूनही वॉरंटीमध्ये होती. अशात स्कूटरचा स्फोट झाला. माझ्या पालकांच्या मृत्यूसाठी कंपनी जबाबदार आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.