Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना मिळणार गिफ्ट, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Narendra Modi Birthday : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्लीमधील ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजनेशी जोडले जाणार आहे.
Narendra Modi
Narendra Modix
Published On
Summary
  • नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे.

  • मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी नवी योजना जाहीर करत तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन केले.

  • पेन्शन योजनेमुळे ५०,००० ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक दिलासा मिळेल.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्लीतील ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजनेशी जोडले जाणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. रविवारी (१४ सप्टेंबर) जाहीर झालेल्या ३ कल्याणकारी योजनांविषयी रेखा गुप्ता यांनी माहिती दिली. पेन्शन योजनेशी जोडले जाण्याकरीता पेन्शनधारकांना ई-जिल्हा पोर्टलद्वारे अर्ज सादर करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सर्व पात्र ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये या योजनेसाठी तब्बल १४९ कोटी रुपयांचे बजेट वाटप करण्यात आले असल्याचे रेखा गुप्ता यांनी सांगितले.

Narendra Modi
Ratnagiri : सकाळी आंदोलनात, दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुणबी समाजाच्या नेत्याची प्राणज्योत मालवली

नव्या पेन्शन योजनेमुळे ५०,००० जेष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक दिलासा मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे जीवन सन्मानाने जगता यावे यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या. भविष्यात लाभार्थ्यांची संख्या वाढली आणि अतिरिक्त निधीची आवश्यकता भासली, तर सरकार विलंब न करता अतिरिक्त अर्थसंकल्पीय मदत करेल असे आश्वासनही त्यांनी दिली.

Narendra Modi
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस, दोन नेत्यांमध्ये संघर्ष असल्याची चर्चा

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पेन्शन योजनेशी संबंधित घोषणा केली होती. ६० ते ६९ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक मदत २००० रुपयांवरुन २,५०० रुपये करण्यात येत आहे आणि आणि ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना २,५०० रुपयांवरून ३,००० रुपये करण्यात येत आहे असे त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले होते.

Narendra Modi
Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदा नाहीच, पुढच्या वर्षी होण्याची शक्यता; वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com