Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस, दोन नेत्यांमध्ये संघर्ष असल्याची चर्चा

Maharashtra Political News : शिंदेसेनेमध्ये धुसफूस असल्याची चर्चा रंगली आहे. ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवरुन प्रीत बंड यांचा फोटो गायब असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Eknath Shinde Maharashtra Politics
Eknath Shinde Maharashtra Politicsx
Published On
  • अमरावतीत शिंदे गटात धुसफूस असल्याची चर्चा.

  • वाढदिवसाच्या बॅनरवरून प्रीती बंड यांचा फोटो गायब.

  • दोन नेत्यांमधील संघर्षावरून राजकीय चर्चांना उधाण.

अमर घटारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Shivsena : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. निवडणुका होण्याआधी शिवसेना शिंदे गटामध्ये अमरावतीत धुसफूस असल्याची मोठी चर्चा होत आहे. अमरावतीमधील शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये संघर्ष सुरु असल्याची चर्चा एका वाढदिवसाच्या बॅनरवरुन रंगली आहे.

माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवरुन शिवसेना उपनेत्या प्रीती बंड यांचा फोटो गायब आहे. प्रीती बंड यांनी काही महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्याआधी ज्ञानेश्वर धाने पाटील यांचा पक्षप्रवेश झाला होता. पाटील यांच्या बॅनरमधून प्रीती बंड यांचा फोटो गायब असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यावरुन शिंदे गटात धुसफूस असल्याचे म्हटले जात आहे.

Eknath Shinde Maharashtra Politics
Ratnagiri : सकाळी आंदोलनात, दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुणबी समाजाच्या नेत्याची प्राणज्योत मालवली

२०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटात असलेल्या प्रीती बंड या बडनेर विधानसभा जागा लढवण्यासाठी इच्छुक होत्या. पण त्यांना संधी मिळाली नाही. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. यामुळे त्यांचे ठाकरे गटातून निलंबन करण्यात आले. त्यानंतर मे २०२५ मध्ये त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

Eknath Shinde Maharashtra Politics
Student Death : इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, काॅलेजच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं

प्रीती बंड यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशानंतर ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी देखील शिंदे गटाचे धनुष्यबाण हाती घेतले. धाने पाटील देखील शिवसेना ठाकरे गटामध्ये होते. १० जून रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेमध्ये प्रवेश केला होता. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे ते माजी आमदार आहेत.

Eknath Shinde Maharashtra Politics
Akola : मूकबधिर मुलीवर राहत्या घरात विनयभंग, तोंडावर रुमाल दाबून गळा दाबला; अकोल्यात भयकंर घडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com