Student Death : इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, काॅलेजच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं

Engineering Student Death : धुळ्यामधील सावळदे जवळील एस व्ही के एमच्या निम्स कॉलेजमधील इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Dhule Engineering Student Death
Dhule Engineering Student Deathsaam tv
Published On
Summary
  • धुळ्यात निम्स कॉलेज विद्यार्थ्याची आत्महत्या.

  • हॉस्टेलमध्ये गळफास घेत स्वत:ला संपवलं

  • आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरु.

भूषण अहिरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Dhule News : धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. धुळ्यातील इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्याने गळफास घेत आयुष्य संपवल्याचे म्हटले जात आहे. तरुणाच्या आत्महत्येच्या बातमीमुळे कॉलेज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या सावळदे जवळील एस व्ही के एसच्या निम्स कॉलेजमधील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. कॉलेजच्या परिसरात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी हॉस्टेलची सोय आहे. या हॉस्टेलमध्ये गळफास घेत या विद्यार्थ्याने स्वत:चा जीव घेतला. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Dhule Engineering Student Death
Akola : मूकबधिर मुलीवर राहत्या घरात विनयभंग, तोंडावर रुमाल दाबून गळा दाबला; अकोल्यात भयकंर घडलं

काॅलेजच्या हॉस्टेलमध्ये आत्महत्या करणाऱ्या इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याचे नाव अथर्व राजपुरोहित असे आहे. तो निम्स येथे कॉम्प्युटर इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता. अथर्व राजपुरोहित हा मूळचा मध्यप्रदेश राज्यातील खरगोन येथील रहिवासी आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचून शिरपूर पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली आहे.

Dhule Engineering Student Death
Crime : घरात घुसून जिम थेरपिस्टचा विनयभंग, त्रासाला कंटाळून तरुणी विषारी औषध प्यायली, नंतर...

धुळे जिल्ह्यातील सावळदे जवळील एस व्ही के एमच्या निम्स कॉलेजमधील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याने हॉस्टेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली याचे कारण अजूनही समोर आलेले नाही. या घटनेमुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dhule Engineering Student Death
Nana Patekar : माझ्या लोकांचं रक्त सांडलेलं आहे तिथे... Ind Vs Pak सामन्याला नाना पाटेकरांचा तीव्र विरोध, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com