Congress : काँग्रेस जेष्ठ नेत्या, माजी महिला आमदाराचे निधन; वयाच्या ८६ व्या वर्षी प्राणज्योत मालवली

Solapur News : काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेत्या, माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
Nirmala Thokal passes away
Nirmala Thokal passes awaysaam tv
Published On
Summary
  • काँग्रेस नेत्या निर्मला ठोकळ यांचे निधन.

  • ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

  • सोलापूरमध्ये आज होणार अंत्यसंस्कार.

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, प्रतिनिधी

Solapur : सोलापूरमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ८६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या सक्रिय आमदार अशी त्यांची ओळख होती. आज (१६ सप्टेंबर) त्यांच्यावर सोलापूरमधील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जेष्ठ नेत्या आणि काँग्रेस पक्षाच्या माजी आमदार निर्मला ठोकळे यांचे मंगळवारी (१६ सप्टेंबर) वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वृद्धापकाळामुळे त्या बरेच दिवस राजकारणापासून दूर दिसून आल्या होत्या. त्यांचे पार्थिव सोलापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील निराळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तोरणा बंगला या ठिकाणी आहे. सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

Nirmala Thokal passes away
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस, दोन नेत्यांमध्ये संघर्ष असल्याची चर्चा

निर्मला ठोकळ यांनी दोन वेळा आमदारपद भूषवले आहे. स्वातंत्र्यसैनियक तुळशीदास जाधव यांच्या त्या कन्या आहेत. काँग्रेस पक्षासह महिला चळवळीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात नगरसेविका म्हणून झाली. १९७२-७६ यादरम्यान निर्मला ठोकळ सोलापूर शहर दक्षिणमधून काँग्रेसपक्षातर्फे विधानसभेवर निवडून आल्या.

Nirmala Thokal passes away
Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदा नाहीच, पुढच्या वर्षी होण्याची शक्यता; वाचा

१९८२ मध्ये ॲड. बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा निर्मला ठोकळ या राज्यपाल कोट्यातून आमदार म्हणून विधान परिषदेवर गेल्या होत्या. सोलापूर शहराच्या राजकारणात त्यांनी कायम सहभाग नोंदवला. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था देखील आहेत.

Nirmala Thokal passes away
Ratnagiri : सकाळी आंदोलनात, दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुणबी समाजाच्या नेत्याची प्राणज्योत मालवली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com