Nandurbar : नंदुरबारच्या जिल्हाधिकारी महिलेचा प्रेरणादायी निर्णय; जुळ्या मुलांचं सरकारी शाळेत अ‍ॅडमिशन, VIDEO

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी त्यांच्या मुलांना सरकारी अंगणवाडीमध्ये दाखल केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
nandurbar district collector mitali sethi video
nandurbar district collector mitali sethi videox
Published On
Summary
  • नंदुरबारच्या जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जुळ्या मुलांना सरकारी अंगणवाडीत दाखल केले.

  • त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून पालकांसमोर आदर्श ठेवला आहे.

  • अंगणवाडीमधील सुविधा सुधाराव्यात, त्याचा इतर मुलांनाही फायदा व्हावा, ही अशी अपेक्षा आहे.

सागर निकवाडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nandurbar Video : आजकाल प्रत्येकजण आपापल्या मुलांना प्रतिष्ठित शाळांमध्ये दाखल करत असल्याचे पाहायला मिळते. यामुळे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमीकमी होत आहेत. खासगी शाळांमध्ये मुलांना दाखल करण्याची स्पर्धा सुरु असताना एक महिला जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या मुलांना सरकारी अंगणवाडीमध्ये दाखल केले आहे.

नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी त्यांच्या दोन्ही जुळ्या मुलांना सरकारी अंगणवाडीत दाखल केले आहे. शहरातील उच्च दर्जाच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश घेण्याऐवजी आपल्या मुलांना सरकारी अंगणवाडीमध्ये त्यांनी दाखल करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुलांना शाळेत सोडायला जातानाचा मिताली सेठ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंगणवाडीच्या चांगल्या दर्जाच्या सेवा आणि सेविकांचे मुलांच्या प्रति असलेले प्रेम पाहून जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठ यांनी आपल्या ३ वर्षांच्या जुळ्या मुलांना सबर आणि शुकर यांना टोकरतलाव येथील अंगणवाडीत दाखल केले आहे. या निर्णयामागे सामाजिक जाणीव असून, मुलांना अंगणवाडीत दाखल केल्यामुळे तिथल्या सुविधांमध्ये सुधारणा होईल आणि त्याचा फायदा इतर मुलांनाही मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.

nandurbar district collector mitali sethi video
Pune : पुणे रिंग रोडबाबत मोठी अपडेट, प्रकल्पाचा Phase 1 अंतिम टप्प्यात, PMRDA शेतकऱ्यांना भरपाई देणार

अंगणवाडीत चांगल्या सेवा देण्यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाला आता विशेष लक्ष द्यावे लागेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नंदुरबारमधील अंगणवाड्यांना एक नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अन्य पालकांनीही सरकारी शाळांना प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कृतीतून म्हटले आहे.

nandurbar district collector mitali sethi video
Sanjay Raut : आनंद दिघे नेते नव्हते, बाळासाहेबांच्या शेजारी त्यांचा फोटो का? संजय राऊतांचा सवाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com