Vande Bharat Train: सिद्धेश्वर एक्सप्रेस ७ तास उशिरा, वंदे भारत ट्रेनही रद्द; रेल्वे अपघातामुळे सोलापूरकडील वाहतूक विस्कळीत

Solapur Train Traffic: वंदे भारत ट्रेनचा डबा रुळावरून घसरल्याने सोलापूरकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. सोमवारच्या रात्रीपासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Solapur Train Traffic:
Passengers wait anxiously as train services towards Solapur face major delays following a Vande Bharat derailment near Pune station.saam tv
Published On

पुणे स्टेशनजवळ मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला सोमवारी सायंकाळी किरकोळ अपघात झाल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वंदे भारत ट्रेनचा एक डबा रुळावरुन घसरल्याने ही दुर्घटना घडली होती. या अपघातात कुठलीच जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेचा रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

Solapur Train Traffic:
Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातामुळे सोलापूरकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. विशेष म्हणजे सोमवारी सायंकाळी झालेल्या दुर्घटनेनंतर सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र अपघाताच्या दुसऱ्या दिवशीही वाहतूक सुरळीत झाली नाहीये. सिद्धेश्वर एक्सप्रेससह अनेक गाड्या तब्बल ६ ते ७ तास उशिराने सोलापूरला पोहोचल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे.

Solapur Train Traffic:
वंदे भारत ट्रेनला अपघात; मुंबईहून सुटलेल्या ट्रेनचा डबा पुणे रेल्वे स्थानकाजवळ घसरला

मुंबई, पुणे तसेच दक्षिण भारतातून येणाऱ्या गाड्यांना मार्ग मिळत नसल्यानं त्या ठिकठिकाणी थांबत थांबत पुढे सरकत होत्या. सिद्धेश्वर एक्सप्रेस साडेसात तास उशिराने सोलापूरला दाखल झाली. तर उद्यान एक्सप्रेस सुमारे पाच तास उशिराने पोहोचली. चेन्नई, कोईमतूर, नागरकोईल, तिरुपती मार्गावरील अनेक गाड्यांही ७ ते ८ तास विलंब झाला होता. गाड्यांची स्थिती अनेक गाड्यासह ते सात तास उशिराने पोहोचल्या तर काही गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत.

सोलापूर-मुंबई २८ एप्रिल रोजीची वंदे भारत एक्सप्रेस रद्द करण्यात आली. तर मुंबई-चेन्नई, मुंबई-बंगळूरु उद्यान एक्सप्रेस यासारख्या प्रमुख गाड्या कर्जत, भिवपुरी, नेरळ, वांगणी आणि अंबरनाथ स्थानकावर थांबून ठेवण्यात आल्या आहेत. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

मुंबईवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा अपघात पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वर येत असताना झाला होता. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर येणाऱ्या ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसचा रुळावरुन घसरलेला डबा पूर्ववत करण्याचं काम आज सकाळपर्यंत सुरू होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com