Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Vande Bharat Train Mishap: पुणे स्थानकाजवळ फलाट क्रमांक ३ वर येत असताना वंदे भारत ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Vande Bharat  Train Mishap :
Vande Bharat train coach derailed near Pune railway station, sparking panic among passengers but no injuries reported.saam tv
Published On
Summary
  • पुणे स्टेशनवर वंदे भारत ट्रेनचा कोच C15 रुळावरून घसरला

  • प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर येताना अपघात

  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

वंदे भारत ट्रेनला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात झाला. मुंबईवरुन सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वेचा कोच नं सी 15 रुळावरून घसरला. पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 3 वर ट्रेन येत असताना हा अपघात झाला. अपघातामुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. सुदैवाने या अपघातात कोणतीच जीवितहानी झाली नाहीये. हा अपघात कशामुळे याचे कारण समोर आले आहे. तसेच अपघाताची चौकशी केली जाणार आहे.

Vande Bharat  Train Mishap :
वंदे भारत ट्रेनला अपघात; मुंबईहून सुटलेल्या ट्रेनचा डबा पुणे रेल्वे स्थानकाजवळ घसरला

ट्रेन नंबर 22225 मुंबई ते सोलापूरकडे निघाली होती. ही ट्रेन पुणे स्थानकात सायंकाळी सुमारे 7.30 वाजता ३ नंबर प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करत असताना डायमंड क्रॉसिंगवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरली.पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग अंतर्गत या क्रॉसिंगच्या उन्नतीकरणाचे काम नियोजित आहे, त्यावेळी ट्रेनला किरकोळ अपघात झाला.

Vande Bharat  Train Mishap :
Vande Bharat Train: मुंबईवरून बंगळुरूला जा सुसाट, वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार; मुंबईतून किती वाजता सुटणार अन् तिकीट किती?

अपघाताचे कारण काय?

वंदे भारत एक्सप्रेस अपघाताचे प्राथमिक कारण समोर आले आहे. मुख्य लाईनवरून प्लॅटफॉर्म क्रमांक तीनच्या दिशेने जात असताना ट्रेनचा डबा रुळावरून घसरला. मुंबईहून पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येत असताना अपघात झाला. मुख्य लाईनवरून ट्रेनचे इंजिन पुढे जात असताना 15 नंबरचा डब्याने ट्रॅक बदलला नाही, यामुळे अपघात घडला. दरम्यान, अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती गठित केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com