Manasvi Choudhary
आजकाल लाखो लोक एकाच वेळेस रेल्वेने प्रवास करतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास सोयीस्कर झाला आहे.
मात्र या रेल्वेच्या प्रवासांसाठी रेल्वे पकडण्याचे महत्वाचे ठिकाण म्हणजे रेल्वेस्थानक आहे.
आजकाल एकाच वेळेस लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मोठ्या जंक्शनपासून ते खेडेगावतच्या सर्वच ठिकाणी रेल्वेस्थानके असतात.
यापैकी काही रेल्वेस्थानके ही नावामुळे, गर्दीमुळे तसचे प्रगतशील डेव्हलपमेंटमुळे प्रसिद्ध आहेत. तर अगदी काही रेल्वेस्थानकांकडे आपण लक्षही देत नाही.
तुम्हाला माहितीयेत का? भारतात काही छोटी रेल्वेस्थानके पण आहेत. आज आपण अश्याच सर्वात छोट्या रेल्वेस्थानकापैकी जाणून घेऊया.
ओडिशातील एक असच स्थानक आहे जे सर्वात लहान स्थानक म्हणून देशात ओळखले जाते.
बांसपानी असं या रेल्वेस्टेशनचे नाव आहे. सर्वात लहान रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते.
ओडिशा राज्यातील सर्वात छोटे रेल्वेस्थानक लहान फ्लॅटफॉर्म आणि मर्यादित सुविधांसाठी ओळखले जाते.
लांब पल्ल्याच्या प्रवासापेक्षा स्थानिक वाहतुकीसाठी हे एक महत्वाचे रेल्वेस्टेशन आहे.
दुर्गम ठिकाणी म्हणजेच लोहखनिजांच्या खाण क्षेत्रात आणि वनप्रदेशांच्या जवळ असल्यामुळे या स्टेशनवर जास्त प्रवासांची वर्दळ नसते.