मनोज जरांगे यांचा ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून सरकारला इशारा
रामदास कदम यांच्या चौकशीची मनोज जरांगे यांची मागणी
५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात मनोज जरांगे यांचा भाजपवर आरोप
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटींचा ऑडिओ बॉम्ब टाकून राजकारणात खळबळ उडवून दिली. या ऑडिओ क्लिपवरून सध्या राजकारण तापले आहे. मनोज जरांगे यांनी भाजप आणि शिंदेसेनेवर अनेक गंभीर आरोप केले. आज पुन्हा पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया देत सरकारला पुन्हा धारेवर धरले. यावेळी मनोज जरांगे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर टीका करत त्यांच्या चौकशीची मागणी केली. याप्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घालावे, असे देखील ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आरोप करत काही सवाल केले. '५०० कोटी देण्याचा आणि बदनाम करण्याचा घाट का घातला? मराठ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न का केला? पक्षाचा फंड माझ्याविरोधात वापरला गेला. तोंडावर गोड बोलायचे आणि मागून षडयंत्र रचायचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. ऑडिओ क्लिपमुळे सर्व पक्ष खडबडून जागे झाले आहेत. जर श्रीकांत शिंदेंनी पैसे घेतले नसतील तर ते गप्प बसणार नाहीत.'
मनोज जरांगे यांनी यावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, 'माझ्याआगोदर रामदास कदम यांच्याकडे क्लिप कशी काय आली. त्यांनी ऑडिओ क्लिपची तारीख कशी सांगितली? त्यांनी फक्त शिंदेंची क्लिप का चालवली? मी ती ऑडिओ क्लिप देण्याआधी २ तास क्लिप फिरली कशी काय? या प्रकरणात रामदास कदम यांची देखील चौकशी केली जावी.', अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.
प्रविण दरेकर हे दिल्लीला गेले आहेत. त्यांच्या दिल्लीवारीवरून मनोज जरांगे यांनी टीका केली. ते म्हणाले की, 'आता दिल्लीच्या वाऱ्या सुरू होऊ शकतात. काही दिवसांनी मी काहीच बोलणार नाही ते काय करतात ते फक्त पाहणार आहे. यापुढे सरकारकडून कुणीही न्यायाची अपेक्षा करू नये. या गर्दीच्या माहोलमध्ये मराठ्यांची घुसमट होत आहे. दोन्ही पक्षाकडून माझ्यावर आरोप सुरू आहेत. पण सगळ्याच गोष्टींच्या मुळाशी मी जाणार आहे. फितुरीपासून वाचण्यासाठी नवी फळी तयार केली जात आहे. मला धमकी दिल्यास मी डोक्यात दगड घालेल. पीएम मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घालावे नाही तर भाजप १०० टक्के महाराष्ट्रात संपुष्टात येऊ शकतो.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.