Manoj Jarange : "रामदास कदम येडा झालाय, त्याला दवाखान्यात न्या!"; जरांगेंचा कदमांवर अत्यंत आक्रमक पलटवार

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी रामदास कदम यांच्या आरोपांना पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. ऑडिओ क्लिपची तारीख आणि वेळ कशी समजली, असा सवाल करत त्यांनी कदम आणि आमदार योगेश कदम यांच्यावर टीका केली.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
Published On: 

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या गंभीर आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन चोख प्रत्युत्तर दिले. कदमांच्या आरोपांचा समाचार घेताना जरांगे यांनी त्यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत वैयक्तिक आणि राजकीय हल्ले चढवले आहेत. यावेळी जरांगे यांनी रामदास कदम यांच्या मानसिक स्थितीवर आणि राजकीय भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

ऑडिओ क्लिप आणि तारीख कशी समजली?

रामदास कदम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जरांगे म्हणाले, "आम्ही तुम्हाला विचारतोय की तुम्हाला त्या ऑडिओ क्लिपची तारीख आणि वेळ कशी माहिती झाली? ती क्लिप व्हायरल कशी झाली, हे जाऊन फडणवीसांना विचारा. मीडियाला धमक्या देऊ नका." तसेच, भाजप नेते प्रसाद लाड यांच्यासोबतच्या जेवणावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, "प्रसाद लाड जेवायला आले तर तुमची पोटदुखी का होते?"

'बाटली' आणि 'सुपारी'वरून जोरदार खडाजंगी

रामदास कदम यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना जरांगे संतापले. ते म्हणाले, "तुम्हाला जेवढ्या खोलात घुसायचंय तेवढं घुसून बघा. तुम्ही चिल्लर माणसासारखा वागायला लागला आहात." पुढे 'बाटली'च्या मुद्द्यावर बोलताना जरांगे म्हणाले, "तूच बाटली पिऊन बघ, कशाची बाटली आहे ते तुलाच कळेल. तुमच्याकडेच बार आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याची चव चांगलीच माहीत आहे!"

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Defender Car : 'डिफेंडर गाडी मला कोणी भेट दिली नाही, ती...' मनोज जरांगेंचा मोठा खुलासा; जळणाऱ्यांना टोला

योगेश कदमांवरही हल्लाबोल

रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले, "तुझ्या म्हाताऱ्याने काय केलं? तो कोणाची सुपारी घेतोय? सुपारी तर तुमच्या घरातच आहे. त्याचं नाव सांगा, तो कोण आहे ते आम्ही शोधून काढू."

Manoj Jarange Patil
शिंदेंना संपवण्यासाठी भाजपचं षडयंत्र, २ आमदारांची नावे सांगितली; कदमांनी दाखवलं जरांगे-भाजप कनेक्शन

"रामदास कदम हेच शिंदेंना संपवायला निघालेत"

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात बोलताना जरांगे म्हणाले, "रामदास कदम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी 'साडेसाती' आहेत. रामदास कदम स्वतः बोलायला एवढी बुद्धी आहे का? ते त्रिकोणी आहेत. शिंदे साहेब बदनाम व्हावेत म्हणून यांनी खूप काही जमा करून ठेवलंय. हा माणूस शिवसेना संपवायला निघाला आहे."

पुढे उपरोधिक टोला लगावत जरांगे म्हणाले, "रामदास कदम येडा झाला आहे, त्याला लवकरात लवकर दवाखान्यात न्या! त्यापेक्षा संजय राऊत बरे आहेत, ते एकदा सकाळी मीडियासमोर येतात आणि विषय संपवतात."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com