Manoj Jarange Defender Car : 'डिफेंडर गाडी मला कोणी भेट दिली नाही, ती...' मनोज जरांगेंचा मोठा खुलासा; जळणाऱ्यांना टोला

Manoj Jarange Defender Car : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीवरून सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी साम टीव्हीच्या ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ मुलाखतीत उत्तर दिले. ही गाडी भेट मिळालेली नसून, एका व्यावसायिकाने हप्त्यावर घेतल्याचे त्यांनी सांगितले.
Manoj Jarange Defender
Manoj Jarange Defendersaam tv
Published On: 

Who bought the Land Rover Defender used by Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील सध्या वापरत असलेल्या आलिशान ‘डिफेंडर’ (Defender) गाडीवरून राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत. "जरांगेंना ही महागडी गाडी कोणी भेट दिली?" असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. मनोज जरांगे पाटील यांनी यावर अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक शब्दांत साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची संपादक निलेश खरे यांच्यासोबतची खास ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ मुलाखत पाहा ‘साम टीव्ही’वर. मराठा आरक्षण आंदोलन, राज्यातील राजकीय घडामोडी, नुकतीच चर्चेत आलेली कथित ऑडिओ क्लिप आणि त्यावरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांवर मनोज जरांगे यांनी रोखठोख भूमिका मांडली.

गाडी कोणी भेट दिली नाही, ती हप्त्यावर आणलेली नवी गाडी

मला कोणीही ही गाडी भेट दिलेली नाही. आमच्याच समाजातील कष्टातून मोठे झालेल्या एका गरिबाच्या लेकराने, आपल्या व्यवसायातून आणि व्यापारातून पैसे जमा करून, हप्त्यावर (EMI) ही नवीन गाडी घेतली होती, असे जरांगे म्हणाले.

मी आधी त्या गाडीत बसण्यास नकार दिला होता. पण माळशिरस आणि पंढरपूरजवळ त्याने ३५ किलोमीटरपर्यंत माझ्या गाडीसमोर स्वतःची गाडी आडवी लावून आग्रह धरला. त्याच्या त्या प्रेमापोटी आणि हट्टामुळे मला शेवटी त्याच्या गाडीत बसावे लागले, असेही ते म्हणाले.

Manoj Jarange Defender
शिंदेंना संपवण्यासाठी भाजपचं षडयंत्र, २ आमदारांची नावे सांगितली; कदमांनी दाखवलं जरांगे-भाजप कनेक्शन

जळणाऱ्या लोकांना मोटरसायकलही कोणी देत नाही

आपलाच माणूस पुढे गेलेला काहींना सहन होत नाही. आम्ही समाजासाठी इमानदारीने काम करतो, म्हणूनच कोट्यवधी लोक प्रेमाने आमच्यासाठी वस्तू आणतात.जे लोक जळतात, त्यांना साधी मोटरसायकलसुद्धा कोणी देत नाही, असा टोला जरांगेंनी लगावला. एकजण तर २८ कोटी रुपयांची गाडी घेऊन आला होता आणि त्यात बसण्याचा आग्रह करत होता. पण मीच त्याला ती गाडी परत नेण्यास सांगितली, कारण कष्टाने कमवले नसेल त्या गोष्टींच्या मागे साडेसाती लागते, असे जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Defender
शिंदेंना संपवण्यासाठी भाजपचं षडयंत्र, २ आमदारांची नावे सांगितली; कदमांनी दाखवलं जरांगे-भाजप कनेक्शन

मराठा समाजात उद्योगपती, व्यावसायिक, मोठे जमीनदार आणि सहकार क्षेत्रातील मोठे लोक आहेत. आपण स्वतः आंदोलनात येऊ शकत नाही, पण समाजातील मुलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या व्यक्तीला मदत म्हणून ते वाहने किंवा इतर सोयी उपलब्ध करून देतात, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com