Manoj Jarange : डिफेंडर गाडी ते ५०० कोटींचा आरोप! मनोज जरांगेंचे प्रत्येक प्रश्नाला रोखठोख उत्तर; पाहा नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange Patil Black and White Exclusive Interview : मनोज जरांगे पाटील यांनी साम टीव्हीच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ विशेष मुलाखतीत आरोप फेटाळले. डिफेंडर गाडी, रामदास कदम यांची टीका आणि कथित राजकीय कटाबाबत त्यांनी भूमिका मांडली.
Manoj Jarange Patil during the Black and White special interview with Saam TV editor Nilesh Khare.
Manoj Jarange Patil speaks about the alleged ₹500 crore audio clip and Maratha reservation in a Saam TV interview.Saam tv marathi
Published On: 

Manoj Jarange Exclusive Interview : महाराष्ट्राच्या राजकारणात ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून सध्या मोठा राजकीय भूकंप आला. याच मुद्द्यावर आणि आरोपांवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ब्लॅक अँड व्हाईट या साम टीव्हीच्या विशेष मुलाखतीत रोखठोक उत्तरे दिली. साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांच्या प्रश्नांना उत्तरे देतानाच जरांगे पाटील यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. १.५ कोटींच्या गाडीपासून ते रामदास कदम आणि योगेश कदमांच्या टीकेला दिलेल्या तिखट उत्तरे देत, या मुलाखतीत जरांगे यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. आगामी काळात मराठा आरक्षणाचा लढा कसा असणार आणि आपल्याविरोधात कोणता कट रचला जात आहे, यावर त्यांनी दिलखुलास भाष्य केले आहे.

प्रश्न : ५०० कोटी रुपये घेऊन आंदोलन मागे घेण्याची किंवा पैसे दिल्याचा ऑडिओ क्लिपमधील दाव्यात किती तथ्य आहे?

मनोज जरांगे पाटील : हे षडयंत्र गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. आम्ही गरिबांसाठी प्रामाणिकपणे काम करतोय, म्हणूनच हे लोक खोट्या गोष्टी पसरवत आहेत. ५०० कोटी लांबच, आमच्या लोकांनी कधी ५०० रुपयेही गोळा केले नसतील. मराठा समाज आरक्षणाच्या जवळ पोहोचत आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातही आरक्षण जात आहे, हे सहन होत नसल्यामुळेच माझ्यावर असे निंदनीय आरोप केले जात आहेत.

प्रश्न : तुम्ही दीड कोटी रुपयांची गाडी वापरता, त्यामुळे तुम्हाला २००-५०० कोटी मिळणे शक्य आहे, असा युक्तिवाद केला जातोय. यावर तुमचे काय म्हणणे आहे?

मनोज जरांगे पाटील : "मला यावर खूप आश्चर्य वाटते. प्रत्येक समाजात श्रीमंत लोक असतात आणि ते गरिबांना मदत करतात. मग मराठ्यांनी किंवा इतर कोणत्याही समाजाने गरिबांना मदत करू नये का? माझी वापरलेली गाडी मला कोणीही भेट दिलेली नाही. ती आमच्याच समाजातील एका कष्टकरी तरुणाने हप्त्यावर (EMI) घेतलेली नवीन गाडी होती. मी सुरुवातीला त्यात बसण्यास नकार दिला होता, पण ३५-४० किलोमीटपर्यंत त्या मुलाने गाडी आडवी लावून आग्रह धरल्यामुळे मी त्यात बसलो होतो. जळणाऱ्या लोकांना साधी मोटरसायकलही कोणी देत नाही."

प्रश्न - तुम्हाला आंदोलन मागे घेण्यासाठी ५०० कोटींची ऑफर किंवा पैसे मिळाल्याची चर्चा आहे, यात किती तथ्य आहे?

उत्तर: अजिबात नाही! माझ्या जवळच्या कोणाशीही पैशाचा विषय काढला, तर मी जाहीर मीडियासमोर सांगतो. मला पैसे, भेट किंवा तिकिटाची गरज नाही. माझ्या जवळच्या लोकांना कोणी एक रुपयाही दिला असला, तर तो माघारी घ्या, असे मी स्पष्ट सांगतो.

प्रश्न: तुमच्याविरोधात नेमका कोणता डाव आखला गेला आहे आणि कोण षडयंत्र रचत आहे?

उत्तर: शिंदे आणि फडणवीस यांच्या बाजूचे काही लोक माझ्या विरोधात डाव टाकत आहेत. त्यांनी माझ्या विरोधात आरोप करा, पैसे मागितले म्हणा, असे सांगून लोक पेरले आहेत. माझ्या गावाकडे किंवा बीडमध्ये जाऊन गर्दीत काहीतरी बोलायचं आणि गरीब मराठ्यांच्या पोरांवर विनाकारण खोट्या केसेस दाखल करायच्या, असा हा थर्ड क्लास प्रकार सुरू आहे. राज ठाकरे यांनीही या बदनामीच्या डावावर भाष्य केले आहे.

प्रश्न : रामदास कदम यांनी या ऑडिओ क्लिपची तारीख (१४ ऑक्टोबर २०२४) आणि इतर माहिती कशी काय बाहेर काढली? यात काय राजकारण आहे?

मनोज जरांगे पाटील: "रामदास कदम यांचे वय झाले आहे, मी त्यांचा आदर करतो. पण ही ऑडिओ क्लिप माझ्याकडे कशी आली, त्याची तारीख १४ ऑक्टोबर २०२४ कशी काय माहिती झाली, हे जाऊन फडणवीसांना विचारा. मी पत्रकार परिषद घेण्याच्या ३ तास आधी मीडियाकडे ती क्लिप कशी पोहोचली? याचा अर्थ यामागे काहीतरी मोठे षड्यंत्र आहे."

Manoj Jarange Patil during the Black and White special interview with Saam TV editor Nilesh Khare.
Manoj Jarange : "रामदास कदम येडा झालाय, त्याला दवाखान्यात न्या!"; जरांगेंचा कदमांवर अत्यंत आक्रमक पलटवार

प्रश्न : मुख्यमंत्र्यांच्या किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांनीच हा कट रचलाय का?

मनोज जरांगे पाटील: "निश्चितच, यामध्ये मोठी माणसे सामील असण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील किंवा भाजपमधील काही लोक माझ्या विरोधात षड्यंत्र रचत आहेत. शिंदे साहेबांनी किंवा फडणवीस साहेबांनी त्यांच्या विश्वासाचा माणूस पाठवावा, मी सर्व नावे सांगतो."

प्रश्न: रामदास कदम आणि योगेश कदम यांनी तुमच्यावर केलेल्या टीकेला तुम्ही अतिशय तिखट शब्दांत उत्तर दिले, त्याबद्दल काय सांगाल?

उत्तर: जरांगे संतापून म्हणाले, "तूच बाटली पिऊन बघ, कशाची बाटली आहे ते तुलाच कळेल. तुमच्याकडेच बार आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याची चव माहीत आहे. रामदास कदम हा शिवसेना संपवायला निघाला आहे आणि तो शिंदेंसाठी 'साडेसाती' आहे. योगेश कदमच्या म्हाताऱ्याने (रामदास कदम) काय केले? सुपारी तर त्यांच्याच घरात आहे. रामदास कदम येडा झालाय, त्याला लवकरात लवकर दवाखान्यात न्या!"

तुम्ही उपोषणादरम्यान लाल गोधडी वापरता आणि गुपचूप काहीतरी खाता, असा आरोप तुमच्यावर होतो. याकडे कसे बघता?

उत्तर: आरोप करणारे कधी माझ्या बाजूला बसले आहेत का? मी खातो की उपोषण करतो, याने त्यांना काय फरक पडतो? माझ्या आई-बापाने कष्टाने घेऊन दिलेली ती गोधडी आहे. मी माझ्या जातीसाठी आयुष्य आणि रक्त जाळलेय. हे लोक सायकलीवरून फिरणारे आणि आता ४०-४० लाखांच्या गाड्यांमध्ये फिरणारे आहेत.

Manoj Jarange Patil during the Black and White special interview with Saam TV editor Nilesh Khare.
शिंदेंना संपवण्यासाठी भाजपचं षडयंत्र, २ आमदारांची नावे सांगितली; कदमांनी दाखवलं जरांगे-भाजप कनेक्शन

प्रश्न : तुमच्यावर कार्यकर्त्यांना फोडण्याचे आणि आंदोलनाच्या नावाखाली टेंडर मिळवण्याचेही आरोप होत आहेत, यावर काय सांगाल?

मनोज जरांगे पाटील: "हे सगळे खोटे आरोप आहेत. माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर विनाकारण खोटे गुन्हे दाखल करण्याचे कारस्थान सुरू आहे. गरीब मराठ्यांच्या पोरांना नाहक अडकवले जात आहे. पण मी कोणालाही भीत नाही, माझा लढा मराठा समाजाला हक्क मिळवून देईपर्यंत असाच सुरू राहील."

प्रश्न: कार्यकर्त्यांना टेंडर मिळणे आणि मराठ्यांच्या आरक्षणावरून ओबीसी मेरिटबाबत जे आरोप होतात, त्यावर तुमचे काय म्हणणे आहे?

उत्तर: हे असले वड्या-फड्याचे आरोप करणाऱ्यांवर मी बोलत नाही. मराठा तरूण शिकायला लागलेत, त्यांचे डोळे उघडायला लागलेत, म्हणून त्यांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. EWS आणि इतर सवलतींचा लाभ इतर जाती घेत असतील तर आमचा विरोध नाही, पण आमच्या हक्काच्या ५८ लाख नोंदी, सगेसोयरे आणि हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी झालीच पाहिजे.

Manoj Jarange Patil during the Black and White special interview with Saam TV editor Nilesh Khare.
Manoj Jarange Defender Car : 'डिफेंडर गाडी मला कोणी भेट दिली नाही, ती...' मनोज जरांगेंचा मोठा खुलासा; जळणाऱ्यांना टोला

प्रश्न: मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण गढूळ होत चालले आहे आणि जातिवाद वाढतोय, असाही आरोप केला जातो. यावर तुमची काय भूमिका आहे?

मनोज जरांगे पाटील: "मी कधीही जातिवादाचे समर्थन करत नाही. ईडब्ल्यूएस (EWS) असो वा इतर गोष्टी, इतर जातींनी त्याचा लाभ घेतला तर आमचा विरोध नाही. पण आमच्या हक्काचे ५८ लाख नोंदी आणि सगेसोयरे यांचे जीआर लागू करून मराठ्यांना न्याय मिळवून देणे हाच आमचा अंतिम उद्देश आहे. समाज मोठा आहे आणि समाजाचे हीत हेच आमचे सर्वस्व आहे."

प्रश्न: या सगळ्या वादानंतर तुमच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार?

उत्तर: मराठ्यांचे संपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत मी मागे हटणार नाही. सातारा, कोल्हापूर संस्थानांचे गट, हैदराबाद गॅजेट आणि पश्चिम महाराष्ट्राचे आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील. सरकारने कितीही डाव टाकले, तरी मराठा समाज आता जागृत झाला आहे आणि आपला हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com