Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Fuel Chaos in Maharashtra: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवरून पेट्रोल पंपावर आता हाणामारी होऊ लागल्या आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल पंपावर गोंधळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO
Diesel CrisisSaam Tv
Published On
  • महाराष्ट्रात डिझेल टंचाईचा फटका

  • शेतकऱ्यांचे डिझेलसाठी आंदोलन

  • पेट्रोल पंपांवर हाणामारी आणि गोंधळ

  • खरीप हंगामात इंधन संकट वाढले

गिरीश निकम, साम टीव्ही

इंधनाचा पुरेसा साठा असल्याचा दावा सरकार करतंय. मग राज्यातल्या अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेलची टंचाई का आहे? पेट्रोल पंपांवर हाणामारी आणि राडे का होतायत असा प्रश्न पडलाय. लाखो लिटरचा साठा नेमका कुठे जातोय? शेतकऱ्यांचे हाल कुणामुळे होत आहेत? पाहूया एक खास रिपोर्ट...

ऐन शेती मशागतीच्या काळात इंधन टंचाईमुळे शेतकरी कचाट्यात सापडलाय. सरकार पुरेसा साठा असल्याचं सांगत असलं तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. कारण इंधन साठ्याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. 22 मेच्या स्टॉक रिपोर्टमध्ये लाखो लिटर इंधन उपलब्ध असल्याचं उघड झालंय. तरीही पंपांवर रांगा लागल्यात. शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाहीये...छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली आकडेवारी उघड झाली असून एवढं पेट्रोल-डिझेल नेमकं कुठं गायब होतं असा प्रश्न पडलाय.

लाखो लिटर इंधन गेलं कुठे?

  • 22 मे 2026च्या स्टॉक रिपोर्टनुसार पेट्रोलचा साठा 15 लाख 17 हजार लिटर

  • 7 लाख 65 हजार लिटर पेट्रोल उपलब्ध

  • डिझेलचा एकूण साठा 13 लाख 8 हजार लिटर

  • साठा असतानाही वाहनांच्या रांगा का?

  • डिझेल नसल्यानं शेती मशागतीची कामंही रखडली

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO
Petrol Diesel Price Today : पेट्रोल डिझेलच्या किमतीत दहा दिवसात तिसऱ्यांदा वाढ, सर्वसामान्यांना मोठा फटका; आजचा दर किती ? जाणून घ्या

डिझेल मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झालाय. संभाजीनगरच्या खंडाळामध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलय. प्रशासनाने कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी घातल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वैजापूर-शिऊर महामार्गावर रोखला. इंधन टंचाईच्या तणावातून आता हाणामारीच्या घटना समोर येऊ लागल्यात...शेगावमधील एका पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल देण्यास नकार दिल्यानं कर्मचारी आणि ग्राहकामध्ये जोरदार फ्रीस्टाईल हाणामारी झालीय.

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO
Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

जालन्यातील बदनापूरमध्ये पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून पंप कर्मचारी आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झालीये. त्यामुळे काही काळ पंपावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बुलढाण्यात पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी शेतकऱ्यांनी रात्रभर रांगा लावल्याय. खरीप मशागतीसाठी डिझेल आवश्यक असल्यानं शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह रस्त्यावरच मुक्काम केला. झोपायला जागा नसल्यानं अनेकजण ट्रॅक्टरवर बसूनच डिझेलचा टँकर येण्याची वाट पाहत होते.

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO
Petrol-Diesel Rate: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त;भारतात मात्र १० दिवसात तिसऱ्यांदा वाढले दर

बीड मध्येही दिवसभर शेतात राबल्यानंतर रात्री डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागतायत. काही पंपचालकांकडे साठा असूनही ते सुरुवातीला पंप बंद ठेवतायत आणि एकदम रात्री चालू करतायत. वाशिम जिल्ह्यात डिझेलच्या भीषण टंचाईमुळे शेतकरी हवालदिल झालाय. मध्यरात्रीपर्यंत पेट्रोल पंपांवर गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालंय. मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या या तुटवड्यामुळे पेरणीची कामं खोळंबलीत.

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर नवे जाहीर, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

परभणीत डिझेलच्या टंचाईमुळे नागरिक आणि शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या इंधन तुटवड्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक पाहायला मिळतायंत. नांदेड जिल्ह्यात डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे शेतकरी हवालदिल झालेय. हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल पंपावर डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याय. शेतकरी रात्रभर कॅन घेऊन पंपावर मुक्काम करत आहेत. राज्यात इंधन पुरवठ्याचं योग्य पद्धतीनं नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच जनतेला विश्वासात घेऊन यावर उपाय योजण्याची गरज आहे. अन्यथा रस्त्यावरचा हा संघर्ष वाढला तर ऐन खरीप हंगामात परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO
Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका, 'या' शहरात ११२ रुपयांना पेट्रोलची विक्री; तुमच्या शहरातील दर किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com