Petrol Diesel Price Today : पेट्रोल डिझेलच्या किमतीत दहा दिवसात तिसऱ्यांदा वाढ, सर्वसामान्यांना मोठा फटका; आजचा दर किती ? जाणून घ्या

Petrol Diesel Today Price Hike News : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सलग दहा दिवसांत तिसऱ्यांदा झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा परिणाम होत आहे.
FUEL PRICE HIKE IN INDIA: PETROL AND DIESEL RATES RISE AGAIN AMID MIDDLE EAST TENSIONS
FUEL PRICE HIKE IN INDIA: PETROL AND DIESEL RATES RISE AGAIN AMID MIDDLE EAST TENSIONSSaam Tv
Published On
Summary
  • पेट्रोल ८७ पैशांनी, डिझेल ९१ पैशांनी महाग

  • १० दिवसांत तिसरी दरवाढ; एकूण वाढ सुमारे ₹५

  • महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त

  • सरकारने इंधन तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचे पडसाद आता भारतातही उमटताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढीचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ जाहीर करण्यात आली असून, पेट्रोल प्रतिलिटर ८७ पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर ९१ पैशांनी महागले आहे. विशेष म्हणजे, गेल्या दहा दिवसांतील ही तिसरी दरवाढ ठरली आहे, ज्यामुळे नागरिकांच्या खिशावरचा भार अधिक वाढला आहे.

यापूर्वी १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १९ मे रोजीही दरात वाढ झाली होती. या सलग दरवाढीमुळे फक्त दहा दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सुमारे ५ रुपयांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर आता ९९.५१ रुपये प्रतिलिटरवर पोहोचला असून, डिझेलचा दर ९२.४९ रुपये प्रतिलिटर झाला आहे. या वाढत्या दरांमुळे वाहतूक खर्चात वाढ होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही होऊ शकतो.

FUEL PRICE HIKE IN INDIA: PETROL AND DIESEL RATES RISE AGAIN AMID MIDDLE EAST TENSIONS
Bank Closed : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, शनिवारपासून ६ दिवस बँका बंद, कारण काय?

दरम्यान, इंधन तुटवड्याच्या अफवा पसरत असतानाच केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने मात्र स्पष्टपणे कोणताही तुटवडा नसल्याचे सांगितले आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे. नागरिकांनी घाबरून जास्त प्रमाणात इंधन खरेदी करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

FUEL PRICE HIKE IN INDIA: PETROL AND DIESEL RATES RISE AGAIN AMID MIDDLE EAST TENSIONS
Chia Seeds : वजन कमी करण्यासाठी पाण्यातून सब्जा पिता? थांबा, आधी जाणून घ्या पिण्याची योग्य पद्धत

काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर गर्दी दिसून आली असली, तरी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम देशातील अर्थव्यवस्थेवर होत आहे. इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, येत्या काळात सर्वसामान्यांच्या आर्थिक गणितावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com