सब्जामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने भूक कमी होते
फक्त पाण्यासोबत सब्जा घेणं पुरेसं नाही
दही + सब्जा = ‘सिनबायोटिक’ कॉम्बो, आतड्यांसाठी फायदेशीर
योग्य पद्धतीने सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते
आजकाल तरुणांमध्ये फिटनेसबाबत जागरूकता वाढत असताना सब्जा (Chia Seeds) हे सुपरफूड म्हणून मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत. अनेकजण वजन कमी करण्यासाठी सब्जा पाण्यात भिजवून पितात. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते आणि भूक कमी होते, असे मानले जाते. मात्र, तज्ज्ञांच्या मते, केवळ पाण्यात भिजवलेल्या सब्जाचे सेवन केल्याने अपेक्षित फायदे मिळत नाहीत.
सुमारे दोन चमचे सब्जामध्ये अंदाजे १० ग्रॅम फायबर असते, जे पचनक्रिया मंदावण्यास मदत करते. त्यामुळे थोड्या वेळासाठी भूक कमी होऊ शकते. पण यामुळे शरीरातील चरबी थेट कमी होते, असे नाही. तसेच, फक्त पाण्यासोबत सब्जा प्यायल्याने त्याचे इतर पोषक घटक पूर्णपणे शरीराला मिळत नाहीत.
तज्ज्ञांच्या मते, सब्जाचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी दह्यासोबत किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाणे अधिक योग्य ठरते. दही हे प्रोबायोटिक असते, तर सब्जा प्रीबायोटिक म्हणून काम करतात. या दोघांच्या एकत्रीकरणातून ‘सिनबायोटिक’ तयार होते, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
या एकत्रीकरणामुळे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होते आणि शॉर्ट-चेन फॅटी ॲसिड्स तयार होतात. हे घटक पचन सुधारतात, आतड्यांचे संरक्षण करतात आणि शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतात. परिणामी, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि अनावश्यक खाण्याची इच्छा कमी होते.
याशिवाय, ग्लुकोज कमी होण्यास मदत होत असल्याने शरीरातील चरबी कमी होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सब्जा उपयुक्त ठरतो, मात्र तो योग्य पद्धतीने खाणे गरजेचे आहे. पुढच्या वेळी तुम्ही सब्जा खात असाल, तर फक्त पाण्यात न भिजवता दह्यासोबत किंवा हेल्दी स्मूदीमध्ये मिक्स करून खा. योग्य पद्धतीने सब्जा खाल्ल्यास तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.