

पाकिस्तानमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात इंधन दरात कपात.
भारतात १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले.
इराण-अमेरिका तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार.
इराण-अमेरिका तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार होत आहे. भारतात दहा दिवसात तिसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. परंतु भारताशेजारील देशात म्हणजेच पाकिस्तान पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत. पाकिस्तानमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात इंधनाच्या दरात कपात करण्यात आली आहे.
पाकिस्तान सरकारने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ६ रुपये आणि हाय-स्पीड डिझेलच्या (HSD) दरात प्रति लिटर ₹६.८० यांनी कपात केली आहे. नवीन दरांनुसार, पाकिस्तानमध्ये आता पेट्रोलची किंमत प्रति लिटर ₹४०३.७८ आणि हाय-स्पीड डिझेलची किंमत प्रति लिटर ₹ ४०२.७८ झाली आहे. हे नवीन दर २३ मे पासून लागू करण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ५ रुपयांची कपातही करण्यात आली होती. पेट्रोलचा वापर प्रामुख्याने खासगी वाहने, दुचाकी, रिक्षा आणि लहान वाहनांमध्ये केला जातो. त्यामुळे कमी किमतीमुळे सर्वसामान्य लोकांना विशेषतः मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला आहे. हाय-स्पीड डिझेलचा वापर ट्रक, बस आणि मोठ्या जनरेटरमध्ये केला जातो, यामुळे डिझेलच्या कमी किमतींचा परिणाम वाहतूक खर्चावरही होऊ शकतो.
सध्या पाकिस्तानात किमती कमी होत असल्या तरी आधी तेथे पेट्रोल आणि डिझेलच्या दराने भडका घेतला होता. ६ मार्च रोजी इराण- अमेरिका आणि इस्रायल संघर्ष सुरू झाल्यानंतर पाकिस्तानी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ५५ रुपयांपर्यंत वाढ केली होती. यानंतर २ एप्रिल रोजी पेट्रोलच्या दरात ४३ टक्के आणि डिझेलच्या दरात ५५ टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती.
फेब्रुवारी महिन्यात इस्रायल-इराण आणि अमेरिकेत तणाव सुरू झाला होता. तेव्हापासून पाकिस्तान सरकार इंधनाच्या किमतीचा आढवा घेण्यासाठी शुक्रवारी आढावा बैठक घेत असते. त्यानंतर तेथे इंधनाच्या दरात चढउतार होताना दिसून येतो. भारतातही इंधन दरवाढी झाली आहे, भारतात दहा दिवसात तिसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. जरी येथील दरवाढ पाकिस्तानइतकी लक्षणीय नसली तरी, गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीनवेळा वाढ करण्यात आली आहे. शनिवारी पेट्रोल प्रति लिटर ८७ पैशांनी आणि डिझेल प्रति लिटर ९१ पैशांनी महाग झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.