Petrol-Diesel Price : मुंबई-पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आज पेट्रोल-डिझेलचे दर काय? पाहा लिस्ट

Fuel Price : रविवारी सकाळी 6 वाजता कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर अपडेट केले आहे.
Petrol Diesel Price Today (24 August)
Petrol Diesel Price Today (24 August)Saam tv
Published On

Mumbai News :

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमधील चढ-उतारादरम्यान देशात पेट्रोल डिझेलचे दर आजही स्थिर आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून देशातील इंधनाचे दर दररोज जाहीर केले जातात. रविवारी सकाळी 6 वाजता कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर अपडेट केले आहे.

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 11 पैसे स्वस्त होऊन 102.63 रुपये आणि डिझेल 9 पैसे स्वस्त दराने 94.24 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. (Latest Marathi News)

Petrol Diesel Price Today (24 August)
Royal Enfield On Rent: बुलेट चालवा फक्त १२०० रुपयांत! सामान्यांच्या खिशाला परवडणारा रेंटल प्रोग्राम काय आहे?

क्रूड ऑईलचे दर

WTI क्रूड ऑईलच्या किमती आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी 0.45 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल 90.03 डॉलरवर बंद झाले. ब्रेंट क्रूडच्या किंमतीत 0.03 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. ती प्रति बॅरल 93.27 डॉलरवर कायम आहे.

राज्यातील प्रमुख शहरांतील किमती

  • मुंबई- पेट्रोल - 106.31 रुपये/लिटर, डिझेल- 94.27 रुपये/लिटर

  • पुणे- पेट्रोल - 105.84 रुपये/लिटर, डिझेल- 92.36 रुपये/लिटर

  • नाशिक - पेट्रोल - 106.18 रुपये/लिटर, डिझेल- 92.69 रुपये/लिटर

  • ठाणे- पेट्रोल - 105.97 रुपये/लिटर, डिझेल- 92.47 रुपये/लिटर

  • रत्नागिरी - पेट्रोल - 107.43 रुपये/लिटर, डिझेल- 93.87 रुपये/लिटर

  • छत्रपती संभाजीनगर- पेट्रोल - 108 रुपये/लिटर, डिझेल- 95.96 रुपये/लिटर

  • कोल्हापूर- पेट्रोल - 106.25 रुपये/लिटर, डिझेल- 92.89 रुपये/लिटर

  • नागपूर- पेट्रोल - 106.18 रुपये/लिटर, डिझेल- 92.72 रुपये/लिटर

Petrol Diesel Price Today (24 August)
Mutual Fund Nomination: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पुढचे ७ दिवस अत्यंत महत्त्वाचे; हे काम न केल्यास होणार मोठं नुकसान

शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासा

ग्राहकांच्या सोयीसाठी तेल कंपन्या शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासण्याची सुविधा देतात. BPCL ग्राहकांसाठी किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 या क्रमांकावर पाठवा.HPCL ग्राहकांसाठी, HPPRICE <डीलर कोड> लिहा आणि 9222201122 वर पाठवा. इंडियन ऑइल ग्राहकांसाठी, किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 वर पाठवा. त्यानंतर काही मिनिटांतच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर कळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com