रॉयल एनफिल्ड ही सर्वांच्याच आवडीची बाईक आहे. सामान्यांपासून श्रिमंतांपर्यंत या बाईकचे विशेष आकर्शन आहे. बुलेटची सवारी करणे फार अभिमानास्पद वाटते. आपली हौस भागवण्यासाठी अनेक मुलं इएमआयवर बाईक खरेदी करतात. अशात तुमच्याकडे फार कमी पैसे आहेत आणि तुम्हाला बुलेट चालवायची आहे तर तुमचं हे स्वप्न आता पूर्ण होऊ शकतं. (Latest Marathi News)
१५०० पेक्षा कमी किंमतीत चालवा बुलेट
रॉयल एनफिल्ड कंपनीने सामान्यांसाठी ही बाईक चालवण्याची व्यवस्था केली आहे. तुमच्याकडे अवघे १५०० रुपये असतील तरी देखील तुम्ही ही बाईक चालवू शकता. यासाठी कंपनीने रेंटल प्रोग्रास सुरू केला आहे. फक्त १२०० रुपयांना बाईक भाड्याने दिली जात आहे.
या शहरांमध्ये भाड्याने मिळतेय बुलेट
कंपनीने रेंटवर बाईक देण्यासाठी देशातील काही निवडक शहरांची निवड केली आहे. रॉयल एनफिल्ड दिल्ली, जयपूर, जैसलमेर, हरिद्वार, चेन्नई, डेहराडून, मनाली, धर्मशाला या शहरांमध्येच रेंटवर दिली जाणार आहे. देशभरातील एकूण २५ शहरांमध्ये रेंटल प्रोग्राम उपलब्ध आहे.
याबाबत अधिक माहिती कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तुम्ही तेथूनही ही माहिती घेऊ शकता. आतापर्यंत ४० वेगवेगळ्या शॉपमधून ३०० बाईक भाड्याने देण्यात आल्या आहेत. कंपनीच्या या अनोख्या स्किममुळे तुम्हाला स्वस्तात बुलेट चालवता येणार आहे.
बाईक भाड्याने कशी घ्यायची
सामान्य व्यक्तींसाठी कंपनीने एकदम सोपी प्रोसेस ठेवली आहे. यात तुम्हाला फक्त कंपनीच्या साइटवर जावे लागेल. पुढे रेंटल प्रोग्राम सिलेक्ट करा. यावर तुम्हाला पीकअप आणि ड्रॉपचीवेळ आणि चलन भरावे लागेल. त्यानंतर शहरातील सेंटरवरून तुम्हाला बाईक भाड्याने मिळवता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.