Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका, 'या' शहरात ११२ रुपयांना पेट्रोलची विक्री; तुमच्या शहरातील दर किती?

Petrol Diesel Price hike: पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या आठ दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली त्यामुळे सर्वसामान्यांना झटका बसला. देशातील १० शहरांमध्ये सर्वात जास्त दराने पेट्रोल-डिझेलची विक्री होत आहे.
Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका, 'या' शहरात ११२ रुपयांना पेट्रोलची विक्री; तुमच्या शहरातील दर किती?
Petrol Diesel PriceSaam Tv
Published On

Summary -

  • पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली

  • हैदराबादमध्ये पेट्रोल ११२ रुपयांच्या पार गेले

  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा भारतावर थेट परिणाम

  • इंधन दरवाढीमुळे महागाई आणि वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता

आखाती देशांमध्ये असलेल्या तणावाच्या परिस्थितीचा परिणाम जगावर होत आहे. भारताला देखील याचा मोठा फटका बसत आहे. भारतात महागाई वाढली आहे. महागाईचा फटका पुन्हा एकदा भारतीय ग्राहकांना बसला आहे. गेल्या आठ दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर १ रुपयाने वाढ झाली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर, वाहतूक खर्चावर आणि फळे तसंच भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होताना दिसत आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्याभरात इंधनाच्या दरात प्रति लिटर एकूण ५ रुपयांची वाढ झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ८७ पैशांनी वाढून ९९.५१ रुपयांना विकले जात आहे. तर डिझेल ९१ पैशांनी वाढून ९२.४९ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. हैदराबाद आणि तिरुवनंतपुरममध्ये परिस्थिती सर्वात गंभीर आहे. या दोन्ही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका, 'या' शहरात ११२ रुपयांना पेट्रोलची विक्री; तुमच्या शहरातील दर किती?
Petrol Diesel Rate: राज्यात खासगी पंपांवर पेट्रोल-डिझेल महागलं; आता प्रति लिटर 'इतके' रुपये मोजावे लागणार

देशभरातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किमती ११० रुपयांच्या वर गेल्या आहेत. हैदराबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर ११२.८१ रुपयांवर पोहोचला आहे. सध्या देशात सर्वात महाग पेट्रोल हैदराबादमध्ये विकले जात आहे. अवजड वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलच्या किमतीनेही काही शहरांमध्ये १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका, 'या' शहरात ११२ रुपयांना पेट्रोलची विक्री; तुमच्या शहरातील दर किती?
Petrol Diesel Price Today : पेट्रोल डिझेलच्या किमतीत दहा दिवसात तिसऱ्यांदा वाढ, सर्वसामान्यांना मोठा फटका; आजचा दर किती ? जाणून घ्या

इंधनाच्या किमतींमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. ही वाढ अलिकडच्या काळात होऊ लागली आहे. आंतरराष्ट्रीय तणाव आणि भारतीय तेल कंपन्यांना झालेला तोटा या दोन्हींच्या एकत्रित परिणामामुळे इंधनाचे दर वाढताना दिसत आहेत. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त झाली आहे.

भारत आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८८ टक्क्यांपेक्षा जास्त तेल आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारातील कोणत्याही दरवाढीचा देशांतर्गत किमतींवर थेट परिणाम होतो. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत.

Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका, 'या' शहरात ११२ रुपयांना पेट्रोलची विक्री; तुमच्या शहरातील दर किती?
Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; वाचा मुंबई, पुणे ते नाशिक, नागपूरमधील भाव

देशातील प्रमुख १० शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर किती?

हैदराबाद -

पेट्रोल - ११२.८१ रुपये

डिझेल - १००.९४ रुपये

तिरुवनंतपुरम-

पेट्रोल - ११२.६४ रुपये

डिझेल - १०१.५५ रुपये

पाटणा -

पेट्रोल - १११.०० रुपये

डिझेल - ९७.०३ रुपये

कोलकाता-

पेट्रोल - ११०.६४ रुपये

डिझेल - ९७.०२ रुपये

जयपूर -

पेट्रोल - १०९.८४ रुपये

डिझेल - ९५.०५ रुपये

मुंबई -

पेट्रोल - १०८.४५ रुपये

डिझेल - ९५.०२ रुपये

बंगळुरू -

पेट्रोल - १०८.०९ रुपये

डिझेल - ९५.९९ रुपये

भुवनेश्वर-

पेट्रोल - १०६.१८ रुपये

डिझेल - ९७.८० रुपये

चेन्नई -

पेट्रोल - १०५.३३ रुपये

डिझेल - ९७.०० रुपये

गुवाहाटी-

पेट्रोल - १०५.१० रुपये

डिझेल - ९४.०३ रुपये

Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका, 'या' शहरात ११२ रुपयांना पेट्रोलची विक्री; तुमच्या शहरातील दर किती?
Petrol-Diesel Rate: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त;भारतात मात्र १० दिवसात तिसऱ्यांदा वाढले दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com