Petrol-Diesel Price: इंधनाच्या किंमती बदलणार? मुंबई, पुणे ते नागपूर-नशिक, पेट्रोल-डिझेलचे ताजे दर तपासा

Petrol Diesel Price Update: गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत होत्या. त्यामुळे नागरिक हैराण झालेले. पेट्रोलच्या आजच्या दरात वेगळाच आकडा पाहायला मिळतोय.
Petrol-Diesel Price maharashtra
Petrol-Diesel Pricegoogle
Published On
Summary
  • गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या

  • पेट्रोलच्या आजच्या दरात वेगळाच आकडा पाहायला मिळतोय

  • आठवड्याच्या सुरुवातीचे दर प्रति लिटर ८७ पैशांनी वाढलेले

प्रवास करण्यासाठी माणसाला वाहतूक महत्वाची आहे. त्यासाठी पेट्रोल- डिझेलची आवश्यकता असते. पण गेल्या काही दिवसांमध्ये हे दर वाढत होते. त्यामुळे नागरिक त्रस्त होते. मात्र आज दिनांक २२ मे २०२६ रोजी हा आकडा काही वेगळाच आहे. म्हणजेच याच्या आकड्यात कोणत्याही प्रकारचे बदल झालेले पाहायला मिळत नाहीत.

आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत स्थिरता पाहायला मिळतेय. त्यामुळे सगळ्या नागरिकांचं लक्ष आता पुढे रुपयांनी किंमतीत वाढ होईल याकडे लागलं आहे. कारण सध्या होण्याऱ्या पेट्रोल-डिझेलच्या तोट्यामुळे ही रक्कम वाढू शकते अशी भिती अनेकांच्या मनात आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोलचे दर हे प्रति लिटर ८७ पैशांनी आणि डिझेलचे दर हे १९ पैशांनी वाढलेले पाहायला मिळाले होते. पुढे यात वाढ होत गेली. पुढील माहितीत आपण तुमच्या शहरातले सध्याचे पेट्रोल- डिझेलचे दर जाणून घेणार आहोत.

Petrol-Diesel Price maharashtra
EPFO 3.0 Update: EPFO कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! या दिवसापासून ATM आणि UPIमधून काढता येणार PFचे पैसे, तारीख आली समोर

आजचे पेट्रोलचे दर

मुंबई

मुंबईतील पेट्रोलचा दर हा प्रति लीटर १११.७७ तर डिझेलची किंमत ही ९१.५८ रुपये आहे.

पुणे

पुण्यातील पेट्रोलचा दर हा प्रति लीटर १०७.८७ तर डिझेलची किंमत ही ९४.३९ रुपये आहे.

नाशिक

नाशिकमधील पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लीटर १०९.०० तर डिझेलची किंमत ही ९५.८८ रुपये आहे.

कोल्हापूर

कोल्हापूरमधील पेट्रोलचा आजचा दर हा १०८.२९ तर डिझेलची किंमत ही ९४.८४ रुपये आहे.

सोलापूर

सोलापूर मधील पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लीटर १०८.२१ तर डिझेलची किंमत ही ९४.७५ रुपये आहे.

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमधील पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लीटर ११०.०३ तर डिझेलची किंमत ही ९६.९९ रुपये आहे.

Petrol-Diesel Price maharashtra
Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'चा बॉक्स ऑफिसवर धमाका, तिसऱ्या गुरुवारी १०२.७० कोटींचा टप्पा पार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com