Petrol Diesel Rate: राज्यात खासगी पंपांवर पेट्रोल-डिझेल महागलं; आता प्रति लिटर 'इतके' रुपये मोजावे लागणार

Petrol Diesel Price Hike in Maharashtra: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. खाजगी पेट्रोल पंपावर ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला फटका बसणार आहे.
Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceSaam Tv
Published On
Summary

पेट्रोल डिझेलचे भाव वाढले

खाजगी पेट्रोल पंपाचा मोठा निर्णय

पेट्रोलचे दर ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महागलं

आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर होऊ लागला आहे. इंधन पुरवठा कमी झाल्याने किंमती वाढताना दिसत आहे. विविध राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. बिहारमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या त्यानंतर आता महाराष्ट्रातदेखील पेट्रोल डिझेल महागलं आहे.

Petrol Diesel Price
Petrol News : पेट्रोल संपलं? वाहनचालकांनी पेट्रोल पंपाबाहेर केली मोठी गर्दी, राज्यभरात कुठे काय परिस्थिती?

महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल महागलं(Petrol Diesel Rate hike in Maharashtra)

राज्यात खासगी पेट्रोल पंपावरील इंधनाच्या किंमती वाढल्या आहे. भारतातील सर्वात मोठ्या खाजगी इंधन विक्रेत्या कंपनीने पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५.३० रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेलचे दर ३ रुपयांनी वाढले आहेत. मध्य पूर्वेकडील देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत पेट्रोल १०३.५४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.०३ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

इराण-अमेरिका, इस्त्रायल युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी जवळजवळ बंद झाली आहे. इंधनाता पुरवठा याच सामुद्रधुनीद्वारे होतो. इराण-इस्त्रायल युद्धामुळे जागतिक पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे मागच्या आठवड्यापासून भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत हळूहळू वाढ होत आहे.

Petrol Diesel Price
Petrol Diesel Rate: राज्यात पेट्रोल डिझेलचे दर बदलले, परभणी-जळगावमध्ये सर्वात महाग, वाचा तुमच्या शहरातील दर

भारतातील १,०२,०७५ पेट्रोल पंपापैकी ६,९६७ पेट्रोल पंप हे नायरा एनर्जी चालवते. या कंपनीने पेट्रोलच्या किंमतीत वाढ केली असल्याचे सांगितले आहे. व्हॅट करानुसार प्रत्येक राज्यात वेगवेगळी दरवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पेट्रोल प्रति लिटरमागे ५.३० रुपयांनी वाढले आहे. याआधीही बिहारमध्ये पेट्रोलचे दर वाढवण्यात आले आहे.

पेट्रोलबाबत नियम

आता राज्यात पेट्रोलबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. दुचाकीसाठी फक्त २०० रुपयांपर्यंत पेट्रोल तुम्ही भरु शकणार आहात. तर कारसाठी २००० रुपयांपर्यंतचे पेट्रोल भरु शकतात. अनेक ठिकाणी बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन घरी जात आहे. त्यामुळे इतर वाहनांना पेट्रोल मिळत नाही. यामुळेच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Petrol Diesel Price
Petrol-Diesel: पेट्रोल टंचाईची अफवा! टाक्या, हांडे अन् कॅन घेऊन नागरिक पोहचले पेट्रोल पंपावर; पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com