Shreya Maskar
लहान मुलांना चॉकलेट खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही घरीच त्यांच्यासाठी त्याचे आवडते चॉकलेट पुडिंग बनवा. रेसिपी आताच नोट करा.
चॉकलेट पुडिंग बनवण्यासाठी पनीर, कोको पावडर, डार्क चॉकलेट, पाणी, गोंद कतीरा, खजूर, दूध, कॉफी पावडर, बदाम आणि दालचिनी पूड इत्यादी साहित्य लागते.
चॉकलेट पुडींग बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात गोंद कतीरा भिजत ठेवा. दहा ते पंधरा मिनिटांत तो चांगला फुलतो.
दुसऱ्या बाऊलमध्ये डार्क चॉकलेट वितळवून त्यात बदामचे लहान तुकडे मिक्स करा. तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रूट्स देखील तुम्ही टाकू शकता.
मिक्सरच्या भांड्यात पनीर , कोको पावडर, डार्क चॉकलेट आणि खजूर टाकून मिक्सरला वाटून घ्या. मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करू शकता.
यात दालचिनी पूड, दूध आणि पाणी टाकून मिक्स करून घ्या. सगळे पदार्थ छान एकजीव झाले की बाऊलमध्ये काढून घ्या.
चॉकलेट पुडिंगचे बाऊल फ्रिजमध्ये ५-६ तासांसाठी सेट करायला ठेवून द्या. वरून चोको चिप्स, काजू , बदाम टाका. जेणेकरून पुडिंगची चव वाढेल.
तुम्ही या चॉकलेट पुडिंगमध्ये कुकीज देखील टाकू शकतात. यामुळे एक चांगली चव येईल. तसेच मुलं आवडीने खातील.