Coconut Ice Cream Recipe : महागडे कोकोनट आईस्क्रीम घरच्या घरी बनवा, फॉलो करा 'ही' स्टेप बाय स्टेप रेसिपी

Shreya Maskar

कोकोनट आईस्क्रीम

कोकोनट आईस्क्रीम बनवण्यासाठी शहाळ्याची मलई, शहाळ्याचे पाणी, नारळाचे दूध, व्हिप क्रीम, कंडेन्स मिल्क, व्हॅनिला इसेन्स, शहाळ्याची मलई इत्यादी साहित्य लागते.

Coconut Ice Cream | yandex

शहाळ्याची मलई

कोकोनट आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात शहाळ्याची मलई, शहाळ्याचे पाणी आणि नारळाचे दूध घालून मिक्स करा.

Coconut Ice Cream | yandex

 व्हिप क्रीम

आता मोठ्या बाऊलमध्ये व्हिप क्रीम घेऊन ब्लेंडरच्या मदतीने १-२ मिनिटे चांगले फेटून घ्या.

Coconut Ice Cream | yandex

कंडेन्स मिल्क

फेटलेल्या मिश्रणात कंडेन्स मिल्क, व्हॅनिला इसेन्स आणि नारळाची पेस्ट घालून सर्व एकजीव करून घ्यावेत. सर्व मिश्रण नीट मिक्स कराल.

Cream | yandex

शहाळ्याचे तुकडे

२-३ मिनिटे मिश्रण फेटून घ्या. तयार मिश्रणांत शहाळ्याचे बारीक तुकडे करून त्यात शहाळ्याची मलई मिक्स करा.

Coconut Ice Cream | yandex

आईस्क्रीम सेट करा

आईस्क्रीम व्यवस्थित सेट होण्यासाठी ८ ते १० तासांसाठी रेफ्रिजरेटर मध्ये ठेवून द्या. त्यानंतर गारेगार आईस्क्रीमचा आस्वाद घ्या.

Coconut cream | yandex

आईस्क्रीम घरी तयार

अशाप्रकारे पार्लरसारखे कोकोनट आईस्क्रीम घरच्या घरी तयार झाले आहे. लहान मुलांना हे नक्की आवडेल. वाढदिवसाला, सणासुदीला नक्की घरी बनवा.

Coconut Ice Cream | yandex

मलईचे तुकडे

आईस्क्रीम सर्व्ह करताना त्यावर शहाळ्याच्या मलईचे बारीक तुकडे करून घाला. तसेच तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता. आईस्क्रीम ची चव वाढेल.

Coconut Ice Cream | yandex

NEXT : खुसखुशीत तिलोऱ्या कधी खाल्लात का? गावाकडे सणासुदीला खास बनवली जाते 'ही' रेसिपी

Tilauri Recipe | yandex
येथे क्लिक करा...