Tilauri Recipe : खुसखुशीत तिलोऱ्या कधी खाल्लात का? गावाकडे सणासुदीला खास बनवली जाते 'ही' रेसिपी

Shreya Maskar

खुसखुशीत तिलोऱ्या

खुसखुशीत तिलोऱ्या बनवण्यासाठी पांढरे किंवा काळे तीळ, गूळ, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, वेलची पूड, सुंठ पूड, मीठ, तूप, पाणी आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Tilauri Recipe | google

तीळ

खुसखुशीत तिलोऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तीळ हलकेच भाजून घ्या. छान सुगंध आला की गॅस बंद करा. तीळ जळणार नाही याची काळजी घ्या.

Sesame Seeds | yandex

पीठ बनवा

भाजलेले तीळ थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. पीठ थोडे दाणेदारपणा राहू द्या. जेणेकरून तिलोऱ्या छान होतील.

Tilauri Recipe | google

तांदळाचे पीठ

मोठ्या परातीत तीळाचे पीठ, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, गूळ, वेलची पूड, सुंठ पूड आणि चिमूटभर मीठ टाकून सर्व एकत्र करा.

Rice Flour | yandex

पाणी

यात तूप आणि थोडे पाणी टाकून मऊ कणिक मळून घ्या. पीठ जास्त सैल नको, नाहीतर तिलोऱ्या तळताना फुटू शकतात.

Water | yandex

तिलोऱ्या तळा

पीठाचे छोटे छोटे गोळे करा. ज्याला लांब किंवा चपटा आकार द्या. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तिलोऱ्या खरपूस तळून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठे‌वा.

Tilauri Recipe | google

टीप १

तिलोऱ्या बनवताना तीळ जास्त भाजू नका, त्यामुळे कडू चव येते. गूळ फार ओलसर नसावा.

Tilauri Recipe | yandex

टीप २

तिलोऱ्या तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवून द्या. तसेच पीठ मळताना पाणी कमी प्रमाणात वापरा. हा पदार्थ गावाकडे सणासुदीला आवर्जून बनवला जातो.

Tilauri Recipe | google

NEXT : कर्जतची स्पेशल झणझणीत शिपी आमटी; भाताची चव वाढेल, वाचा रेसिपी

Shipi Amti Recipe | yandex
येथे क्लिक करा...