Shreya Maskar
शिपी आमटी ही प्रामुख्याने महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि राशीन परिसरातील एक अत्यंत लोकप्रिय, झणझणीत आणि पारंपरिक रेसिपी आहे.
शिपी आमटी बनवण्यासाठी चणा डाळ, मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, तेल, मीठ, दालचिनी, चक्रीफूल, हळद, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, लसूण, सुकं खोबरं, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी, जिरे, लाल तिखट, धणे - जिरे पूड, गरम मसाला, कांदा, लसूण मसाला, पाणी इत्यादी साहित्य लागते.
शिपी आमटी बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये चणा डाळ, मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ पाण्यात भिजत ठेवा.
त्यानंतर पॅनमध्ये तेल टाकून डाळी भाजून घ्या. तसेच पुढे कुकरमध्ये मीठ, पाणी आणि भाजलेल्या डाळी टाकून शिजवून घ्या. 3-4 शिट्ट्यांमध्ये डाळ चांगली शिजेल.
पॅनमध्ये तेल टाकून खडे मसाले (दालचिनी, चक्रीफूल), हळद, शिजवलेली डाळ टाकून परतून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडी शिजवलेली डाळी टाकून एक पेस्ट तयार करा.
शेवटी पुन्हा एकदा पॅनमध्ये तेल घेऊन त्यात हिरव्या मिरची, लसूण, सुकं खोबरं, कांदा , टोमॅटो, कोथिंबीर, मोहरी, धणे - जिरे पूड चांगले परतून घ्या. त्यात शिजवलेली डाळ आणि डाळीचे पेस्ट दोन्ही मिक्स करा.
फोडणीसाठी पॅनमध्ये मोहरी, तूप, जिरे, कढीपत्ता, लाल तिखट, मीठ, धणे- जिरे पूड, गरम मसाला, कांदा- लसूण मसाला घालून तडका तयार करा आणि तयार फोडणी डाळीवर टाका.
गरमागरम भातासोबत झणझणीत डाळीचा आस्वाद घ्या. ही रेसिपी खायला खूपच टेस्टी आहे.