Shreya Maskar
रोज रोज कांदेपोहे, उपमा, शिरा आणि वडा खाऊन कंटाळा आला असेल, तर विदर्भात प्रामुख्याने बनवला जाणारा गोड आयते हा पदार्थ बनवा. रेसिपी लिहून घ्या.
गोड आयते हा पदार्थ विदर्भातील नाश्त्याला खास बनवला जातो. ही रेसिपी झटपट होते. तसेच हा हेल्दी पदार्थ आहे.
गोड आयते बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, साखर, मीठ, वेलची पूड, तूप इत्यादी साहित्य लागते. याचे योग्य प्रमाण घ्या.
गोड आयते बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, साखर, मीठ आणि वेलची पूड एकत्र करा. ही रेसिपी गावाकडे प्रामुख्याने बनवली जाते.
आता थोडे थोडे पाणी घालून मऊसर कणिक मळून घ्या. कणकेचे छोटे-छोटे गोळे करा आणि त्यांची छोटी पुरी बनवा.तुम्हाला आवडेल तो आकार द्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात गोड आयते दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. गॅस कमी आचेवर ठेवून द्या. जेणेकरून आयते चिकटणार नाही.
गोड आयते गरमागरम चहासोबत खा. तुम्ही मुलांना हे शाळेच्या डब्यासाठी बनवून देऊ शकता. तसेच तुपासोबत खाऊ शकता.
कणिक मळताना पीठात थोडे तूप किंवा तेल टाकल्यावर आयते मऊ होतात. तसेच तुम्ही साखरे ऐवजी गूळाचा देखील वापर करू शकता.