Shreya Maskar
अप्पम हा पदार्थ साउथमध्ये बनवला जातो. हा नाश्त्यासाठी परफेक्ट पदार्थ आहे. तुम्ही वीकेंडला याचा नक्की आस्वाद घ्या.
साउथ स्टाइल अप्पम बनवण्यासाठी तांदूळ, पॅराबॉईल्ड राईस, नारळ, साखर, खोबऱ्याचा किस, मीठ, यीस्ट आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
अप्पम बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तांदूळ ४ ते ५ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा.
तांदूळ भिजवल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात तांदूळ, पॅराबॉईल्ड राईस, खोबऱ्याचा किस, साखर, मीठ, यीस्ट आणि पाणी घालून बारीक करून पेस्ट करून घ्या.
तयार तांदळाचे पीठ एका बाऊलमध्ये काढा आणि चांगले फेटून घ्या. १०-१५ मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या.
आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात अप्पमचे मिश्रण छान गोलाकार पसरवून घ्या. दोन्ही बाजूंनी अप्पम गोल्डन फ्राय होईपर्यंत खरपूस तळा.
टोमॅटोची चटणी, ओल्या नारळाची चटणी, सांबार यांच्यासोबत अप्पमचा आस्वाद घ्या.
सकाळच्या नाश्त्याला अप्पम खाल्ल्याने दिवसभर पोट भरलेले राहते. तसेच हा एक हेल्दी पदार्थ आहे.