Shreya Maskar
सणासुदीला घरी अचानक पाहुणे आले तर सिंपल पद्धतीने झटपट सीताफळ खीर बनवा. रेसिपी आताच नोट करा.
सीताफळ खीर बनवण्यासाठी सीताफळ, दूध, साखर, वेलची पूड, सुका मेवा इत्यादी साहित्य लागते. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात टाकू शकता.
सीताफळ खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम सीताफळाच्या बिया काढून गर वेगळा करा. लक्षात ठेवा चुकूनही बिया राहता कामा नये.
गॅसवर मोठे भांडे ठेवा. त्यात दूध गरम करून चांगले उकळवून घ्या. दूध गरम होत असेल तेव्हा गॅस मंद आचेवर ठेवा. जेणेकरून दूध ओतू जाणार नाही.
दूध घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि वेलची पूड घाला. साखरचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा. कारण सीताफळ आधीच गोड असते.
गरम दुधात सीताफळाचा गर चांगला मिक्स करा. खीर सतत ढवळत राहा. जेणेकरून ती भांड्याला चिकटणार नाही.
५-७ मिनिटे खीर मंद आचेवर शिजवून घ्या. जास्त खीर शिजणार नाही याची काळजी घ्या.
शेवटी सीताफळ खीरमध्ये तम्ही बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स मिक्स करा. ड्रायफ्रूट्समुळे खीर अधिक चवदार बनते.