Shreya Maskar
सकाळी ब्रेकफास्टला इडली, डोसा, पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर ॲव्होकॅडो पनीर सँडविच बनवा. सिंपल रेसिपी नोट करा.
ॲव्होकॅडो पनीर सँडविच बनवण्यासाठी ब्रेड स्लाइस, ॲव्होकॅडो, पनीर, लिंबाचा रस, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, काळी मिरी पावडर, लोणी इत्यादी साहित्य लागते.
ॲव्होकॅडो पनीर सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम ॲव्होकॅडो सोलून त्याचा गर बाऊलमध्ये काढून मॅश करा.
बाऊलमध्ये लिंबाचा रस, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ आणि काळी मिरी पूड घालून चांगली मिक्स करा.
ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर ॲव्होकॅडो पेस्ट पसरवा. त्यावर पनीरचे स्लाइस ठेवा आणि दुसरा ब्रेड ठेवून सँडविच बंद करा. मिश्रण जास्त होणार नाही याची काळजी घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून यात ॲव्होकॅडो पनीर सँडविच दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्या. ब्रेड जळणार नाही याची काळजी घ्या.
तुम्ही ॲव्होकॅडो पनीर सँडविच ओव्हनमध्ये देखील ग्रिल करू शकता. त्यात थोडे बटर देखील टाका.
प्रोटीन शेकसोबत एक ॲव्होकॅडो पनीर सँडविच खाल्लात तर सकाळी पोट भरलेले राहील. तसेच शरीराला चांगले पोषण मिळेल.