Shreya Maskar
जेवणाची रंगत वाढवण्यासाठी किंवा भाजीला पर्याय म्हणून तुम्ही चटपटीत पापडी चाट बनवा. फक्ता ५ मिनिटांत पदार्थ तयार होईल.
पापड चाट बनवण्यासाठी उडीद पापड, लाल तिखट, मीठ, चाट मसाला, तेल, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कच्ची कैरी इत्यादी साहित्य लागते.
पापड चाट बनवण्यासाठी उडदाचे पापड मंद आचेवर भाजून घेऊन पापडाचा चुरा करा. लक्षात ठेवा पापड जळणार नाही याची काळजी घ्या.
एका बाऊलमध्ये पापडाचा चुरा मिक्स करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक टोमॅटो कापून मिक्स करा. टोमॅटोच्या बिया आवर्जून काढा.
त्यानंतर यात तिखट, मीठ आणि चाट मसाला घालून चांगले एकजीव करा. मिश्रणात थोडे तेल घाला. जेणेकरून पदार्थ चवदार बनेल.
त्यानंतर चवीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर, आंबट-गोड चटणी, कैरीचे बारीक तुकडे टाका. लहान मुलांना कैरी खूप आवडते. त्यामुळे पदार्थ खूप टेस्टी होईल.
त्यानंतर मिश्रणात चणे, शेंगदाणे, शेव टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. तुम्ही यात तुमच्या आवडीचे पदार्थ देखील टाकू शकता.
तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही शेजवान चटणी देखील टाकू शकता. हा पदार्थ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी देखील चांगला आहे.