Shreya Maskar
दिवाळी फराळ वेगवेगळ्या प्रकार आणि पदार्थांनी बनवता येतो. फराळात भाजणीची चकली प्रसिद्ध आहे. पण ज्याला भाजणीची चकली बनवता येत नसेल तर सिंपल पद्धतीने तांदळाची चकली बनवा.
तांदळाची चकली बनवण्यासाठी तांदूळ, चणा डाळ, तीळ, तिखट, मीठ, हिंग, हळद आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
तांदळाची चकली बनवण्यासाठी तांदूळ स्वच्छ करून दळून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये थोडे तूप टाकून भाजून घ्या.
तांदळाचे पीठ भाजल्यावर त्यात चणा डाळीचे पीठ, तिखट, हळद, हिंग आणि मीठ घालून चांगले भिजवून घ्या.
पीठ चांगले भाजल्यावर ते एका बाऊलमध्ये टाका. त्यानंतर कोमट पाण्याच्या मदतीने पीठ मळून घ्या.
आता तयार मिश्रण चकली पात्र टाकून घ्या. दुसरीकडे गॅसवर मंद आचेवर तेल गरम करायला ठेवून द्या.
तेल गरम झाल्यावर यात चकल्या पाडून घ्या. चकल्या चांगल्या खरपूस तळून घ्या. चकली जळार नाही याची काळजी घ्या.
अशाप्रकारे अवघ्या १५-२० मिनिटांत खमंग-खुसखुशीत तांदळाची चकली तयार झाली. दिवाळीत आवर्जून ही रेसिपी बनवा.