Shreya Maskar
भेंडीला गावरान तडका द्या. गावाकडे बनवतात तशी भरली भेंडी बनवा. पारंपरिक रेसिपी आताच नोट करा.
भेंडी, बेसन , शेंगदाण्याचा कूट, किसलेलं खोबरं, कोथिंबीर, आमचूर पावडर, जिरे पूड, धने पूड, लाल तिखट, गरम मसाला, हळद, हिंग आणि कोथिंबीर इत्यादीस साहित्य लागते.
भरली भेंडी बनवण्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून मध्यभागी उभी चिरून घ्या. भेंडीचा चिकटपणा काढण्यासाठी तुम्ही सुरीला लिंबू चोळा. म्हणजे भाजी नीट कापली जाईल.
पॅनमध्ये बेसन , शेंगदाण्याचा कूट, किसलेलं खोबरं, कोथिंबीर, आमचूर पावडर, जिरे पूड, धने पूड, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि हिंग भाजून घ्या.
मसाला थंड झाल्यावर भेंडीमध्ये भरून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, तिखट परतून घ्या.
यात भरलेली भेंडी फ्राय करून घ्या. यात थोड पाणी टाका. जेणेकरून भाजी नीट शिजेल. कच्ची राहणार नाही.
शेवटी हिरवीगार कोथिंबीर भरली भेंडीवर भुरभुरवा. गरमागरम चपातीसोबत भरली भेंडीचा आस्वाद घ्या. लहान मुलांना ही भाजी खूप आवडेल.
तुम्ही ही भाजी टिफीनसाठी घेऊन जा. सर्वजण तुमच्या पदार्थाचे कौतुक करतील. या भाजीसोबत भाकरी खूप छान लागते.