नाशिकच्या नांदगावमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा होणार असल्याच्या अफवेने मोठी खळबळ उडाली. रात्रीपासूनच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांसह नागरिकांनी हांडे, टाक्या आणि कॅन घेऊन मोठी गर्दी केली. शेतीकामासाठी आणि भविष्यातील टंचाईच्या भीतीपोटी गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. समाज माध्यमांवरील अफवांमुळे निर्माण झालेल्या या गोंधळात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
पेट्रोल संपणार असल्याचे मेसेज व्हायरल झाल्यानंतर दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर तसेच इतर वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपांकडे धाव घेतली. डिझेल,पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हांडे, कॅन यासारख्या वस्तू घेऊन पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केली.पेट्रोल, डिझेल खरेदीसाठी माणसांसोबतच वाहनांच्याही रांगा लागल्या होत्या. समाज माध्यमांवर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे पेट्रोल पंपावर गोंधळाचे वातावरण होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.