Hingoli : दुचाकीला २००, तर चारचाकीला २००० रुपयांचे पेट्रोल भरता येणार, कुठे लागू झाला आदेश?

Hingoli Petrol Shortage Rules News : हिंगोलीत पेट्रोल-डिझेलच्या अफवांमुळे नागरिकांची गर्दी वाढल्याने प्रशासनाने इंधन भरण्यावर मर्यादा लागू केल्या आहेत. पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
Hingoli : दुचाकीला २००, तर चारचाकीला २००० रुपयांचे पेट्रोल भरता येणार, कुठे लागू झाला आदेश?
Hingoli Petrol Shortage Rules NewsSaam Tv
Published On
Summary
  • अफवांमुळे पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी

  • हिंगोलीत इंधन भरण्यावर मर्यादा लागू

  • दुचाकी: २०० रुपये, चारचाकी: २००० रुपये मर्यादा

  • पोलीस बंदोबस्त आणि प्रशासन सतर्क

संदीप नागरे, हिंगोली

आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा फटका भारताला बसला आहे. युद्धामुळे देशभरात गॅस टंचाई निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलचा साठा संपल्याच्या अफवा वेगाने पसरत आहेत. राज्यभरात या अफेने एकच धुमाकूळ घातल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या भीतीपोटी नागरिकांनी आपली वाहन घेऊन सकाळपासूनच पेट्रोल पंपावर रांगा लावल्या आहेत. अशातच हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी नवे नियम लागू केले आहेत.

हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आदेशात म्हटले आहे की, दुचाकी चालकांना पेट्रोल पंपावर फक्त दोनशे रुपयांचे पेट्रोल भरता येणार आहेत, तर तीन व चार चाकी वाहन चालकांना दोन हजार रुपयांपर्यंत इंधन भरता येणार आहे . त्यासोबतच पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेला इंधनाचा साठा पुरवठा झालेला साठा आणि पेट्रोल कंपन्यांकडून प्राप्त झालेला साठा पेट्रोल पंपावर दर्शनी भागात बोर्डवर लिहून ठेवण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

Hingoli : दुचाकीला २००, तर चारचाकीला २००० रुपयांचे पेट्रोल भरता येणार, कुठे लागू झाला आदेश?
Political News : आधी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, आता पोलिसांकडून अटक; बड्या नेत्याला बेड्या ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

यासोबतच पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहन प्रशासनाने आता केले आहे. हिंगोलीत पेट्रोल डिझेल संपल्याची अफ़वा पसरल्याने कालपासून नागरिकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरून घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत. दरम्यान पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com