Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर नवे जाहीर, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Rate Today: रोज सकाळी इंधन कंपन्या पेट्रोल डिझेलचे दर अपडेट करतात. महाराष्ट्रातदेखील पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरात फार काही बदल झालेला नाही.
Petrol Diesel Rate
Petrol Diesel RateSaam Tv
Published On
Summary

पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर

महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर स्थिर

वाचा तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर

रोज सकाळी इंधन कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करत असतात. पेट्रोल डिझेलच्या दरात रोज थोडाफार बदल होत असतो. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर जास्त वाढले किंवा कमी झालेले नाहीत. इंधनाचे दर स्थिर आहेत. आजदेखील इंधन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर वाचा.

Petrol Diesel Rate
Gold Price Today : सोन्याचे दर घसरले! सराफा बाजार उघडताच २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर कोसळले; पाहा आजचे ताजे भाव

आखाती देशांमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या होत्या. त्यामुळे देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता होती. मात्र, अजून तरी पेट्रोल डिझेलचे दर वाढले नाहीत. याचसोबत सध्या युद्ध थांबले आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाचेही दर स्थिर आहेत. भारतातदेखील पेट्रोल डिझेलच्या दरात फार काही बदलल झालेला नाही.

Petrol Diesel Rate
Petrol-Diesel Price: टेन्शन वाढलं! कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Rate in Maharashtra)

मुंबईत पेट्रोलचे दर १०४.४२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.०३ रुपये प्रति लिटर आहे.

पुण्यात पेट्रोलचे दर १०३.८२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.३५ रुपये प्रति लिटर

ठाण्यात पेट्रोल १०३.९१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.४२ रुपये प्रति लिटर

सोलापूरमध्ये पेट्रोलचे दर १०४.१६ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.७१ रुपये प्रति लिटर

साताऱ्यात पेट्रोलचे दर १०४.२७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.२५ रुपये प्रति लिटर

नाशिकमध्ये पेट्रोलचे दर १०४.७४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.२५ रुपये प्रति लिटर

नागपूरमध्ये पेट्रोलचे दर १०४.४२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.९६ रुपये प्रति लिटर

कोल्हापूरमध्ये पेट्रोलचे दर १०५.२६ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.७७ रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Rate
Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, LPG अन् पेट्रोल-डिझेलबाबत सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com