Prajakta Mali In KBC 15: ‘प्राजक्ता तू सगळं कसं मॅनेज करतेस?’, चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचे उत्तर, बिग बींनीही केलं प्राजुचं कौतुक

Prajakta Mali News: प्राजक्ताला थेट बिग बिंच्या शो मध्ये येण्याची संधी मिळाली आहे.
Amitabh Bachchan Video Call To Prajakta Mali In KBC 15
Amitabh Bachchan Video Call To Prajakta Mali In KBC 15Instagram
Published On

Amitabh Bachchan Video Call To Prajakta Mali In KBC 15

प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. अभिनेत्री, बिझनेस वूमन आणि सुत्रांचालिका म्हणून प्राजक्ता माळीची चाहत्यांमध्ये ओळख आहे. प्राजक्ता कायमच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत मालिका, चित्रपट आणि हास्यजत्रेसंबंधित (Maharashtrachi Hasyajatra) माहिती शेअर करत असते. नेहमीच फॅशनमुळे चर्चेत राहणारी प्राजक्ता सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ताला थेट बिग बिंच्या शो मध्ये येण्याची संधी मिळाली आहे. ही संधी तिला तिच्या एका चाहत्याने दिली आहे. (Kaun Banega Crorepati 15)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amitabh Bachchan Video Call To Prajakta Mali In KBC 15
Ananya Panday: 25 वर्षांच्या अनन्याने खरेदी केलं स्वप्नातलं घर, धनत्रयोदशीला केला गृहप्रवेश; फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

हिंदी टेलिव्हिजनसृष्टीमध्ये बिग बी अमिताभ (Big B Amitabh Bachchan) बच्चन होस्ट करत असलेले ‘कौन बनेगा करोडपती १५’ ची नेहमीच चर्चा होते. आपल्या शोमध्ये आलेल्या सर्वच स्पर्धकांची आपल्या परीने इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. अशीच इच्छा स्पर्धक अजयची (Fan's) पूर्ण केली आहे. हॉट सीटवर बसल्यानंतर त्याने बिग बींना आपण अभिनेत्री प्राजक्ता माळीचा खूप मोठा फॅन असल्याचे सांगितले. यावेळी बिग बी अमिताभ बच्चनसह प्राजक्ताच्या चाहत्यानेही तिच्या अभिनयाचे तोंड भरून कौतुक केले.

नुकतंच अभिनेत्री प्राजक्ता माळीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, बिग बी स्पर्धक अजयला तुला कोणासोबत तरी बोलायचं आहे, असू म्हणून थेट प्राजक्ता माळीला व्हिडीओ कॉल केला. प्राजक्ताला पाहून अजय सुद्धा आनंदी झाला. यावेळी बिग बींना प्राजक्ताचे स्वागत केले, स्वागत केल्यानंतर अजय तुझा खूप मोठा फॅन आहे, असं त्यांनी तिला सांगितलं. अजयने बिग बिंच्या समोर प्राजक्ताचे केलेले कौतुक ऐकून तिने त्याचे कौतुक केले आहे, त्याचे आभारही तिने मानले.

Amitabh Bachchan Video Call To Prajakta Mali In KBC 15
Grammy Awards 2024: PM मोदींनी लिहिलेल्या गाण्याची परदेशातही चर्चा, ग्रॅमी पुरस्कारासाठी मिळालं नामांकन

यावेळी प्राजक्ताच्या चाहत्याने तिला ‘तु तुझा बिझनेस, योगा आणि अभिनय हे सगळं कसं काय मॅनेज करते?’ असा प्रश्न विचारला. यावर तिने अगदी सुंदर उत्तर दिले, तु विचारलेल्या प्रश्नातच माझं उत्तर आहे, मी रोज योगा करते. मी रोज ध्यान, प्राणायम करते. जर आपल्या कामावर आपले खूप प्रेम असेल, तर आपण नक्कीच वेळात वेळ काढतो. सोबतच प्राजक्ताने अजयला चांगलं खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या. याशिवाय जर तू जिंकलास, तर आपण नक्की भेटू असंही तिने अजयला सांगितलं. सोबतच यावेळी प्राजक्ताने आपल्या लाडक्या चाहत्याला ‘मित्रा तू लढ आम्ही तुझ्यासोबत आहोत.’ असं म्हणत त्याला धीर दिला.

Amitabh Bachchan Video Call To Prajakta Mali In KBC 15
Rashmika Mandanna: रश्मिका मंदान्ना डीपफेक व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल, दिल्ली पोलिसांनी तपास केला सुरू

यानंतर प्राजक्ताने अमिताभ बच्चन यांचे आभार मानले व तुम्ही असंच आमच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोवर प्रेम करत राहा असं त्यांना सांगितलं. प्राजक्ता माळीने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले आहे. “काय सांगू किती भारी वाटलं. अशा पद्धतीनं कौन बनेगा करोडपतीच्या १५व्या सीझनमध्ये सहभागी होईन असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणूनच मी नेहमी म्हणते; Fans are one of the strongest pillars of my life. And see, that’s so true.. अजय मुळे ते शक्य झालं. सोनी टेलिव्हिजनची टीम पण इतकी खूश झाली होती की त्यांनीही फार आनंदानं खूप सहकार्य केलं. त्यांचेही मनापासून आभार...”

Amitabh Bachchan Video Call To Prajakta Mali In KBC 15
Bollywood News, Jayaprada: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट, काय आहे संपूर्ण प्रकरण?

“आणि सरते शेवटी आमचे लाडके सोनी मराठी महाराष्ट्राची हास्यजत्रेचे अमित फाळके; अमिताभजींशी अशा पद्धतीच्या कार्यक्रमात नेमके काय-किती-कसे बोलावे ह्या विषयी मनात अनेक प्रश्न होते, ज्यात यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले. आणि मला लाभलेल्या ह्या संधीसाठी त्यांना माझ्यापेक्षाही जास्त आनंद झाला. त्यांनाही मनापासून धन्यवाद.” असं म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे.

प्राजुच्या ह्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या व्हिडीओवर अमृता खानविलकर, ओमकार शिंदे, मुग्धा गोडबोले- रानडे सह काही सेलिब्रिटींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

७ लाखांहून अधिक चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहिला असून ६७ हजारांहून अधिक लाईक्स चाहत्यांनी दिले आहेत. (Entertainment News)

Amitabh Bachchan Video Call To Prajakta Mali In KBC 15
Sunny Leone: सनी लिओनीच्या प्रयत्नांना यश, बेपत्ता झालेली ९ वर्षांची अनुष्का सापडली; मुंबई पोलिसांचे मानले आभार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com