Kaun Banega Crorepati: हॉट सीटवरील स्पर्धक थंडीने कुडकुडाला, बिग बींनी थेट स्वतःच जॅकेट केलं गिफ्ट

Amitabh Bachchan: हॉत सीटवर बसलेल्या स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्याकडे केली तक्रार.
BIG B Gift To KBC 15 Contestant
BIG B Gift To KBC 15 ContestantSaam TV

Big B Gave Gift To KBC 15 Contestant:

अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती'च या १५ वा सीजन काही आठवड्यांपूर्वी आपल्या भेट आला. या शोमध्ये अनेक स्पर्धक इच्छा आणि अपेक्षा घेऊन हॉट सीटवर येण्याचं स्पप्न बघतात.

बिग बी अमिताभ बच्चन देखील या स्पर्धकांना हवी ती मदत करता त्यांना काय हवं काय नको याची विचारपूस करतात. स्पर्धकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतात.

BIG B Gift To KBC 15 Contestant
Pooja Bhatt Controversy: आधी वडिलांना किस केलं, मग टॉपलेस फोटोशूट; अनेक वर्षांनंतर पूजा भटने दिलं स्पष्टीकरण

अमिताभ बच्चन शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील विचारतात. त्यांना काही त्रास असेल तर त्यावर बोलतात. तसेच स्पर्धकांची अडचण सोडविण्याचा देखील अमिताभ बच्चन प्रयत्न करतात. दरम्यान अमिताभ बच्चन यांनी एका स्पर्धकाची मदत केली त्यामुळे उपस्थित सगळे त्यांचे फॅन झाले आहेत.

सोनी चॅनलने त्यांच्या सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमो तुफान व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये हॉट सीटवर बसलेला स्पर्धक अमिताभ बच्चन यांच्याकडे तक्रार करताना दिसत आहे. (KBC 15)

स्पर्धक बिग बींना सांगतो की, 'मला खूप थंडी वाजत आहे. थंडीमुळे त्याचे हात चालत नाहीयेत.' हे ऐकताच अमिताभ म्हणतात, 'थंडी कमी करायची आहे, मला बोलायच ना, मी करतो.'

बिग बी म्हणतात, 'ए भाई साहेब माझं माणूस आहे ना, त्याला सांगा मी जे जॅकेट घालून आलो आहे ते घेऊन ये. इथून गाडीतूनच आणायचं आहे. घरे नाही जायचं.'

बिग बी हातात जॅकेट घेऊन बोलतात 'ही माझ्याकडून तुला भेट.' तसेच अमिताभ बच्चन त्याला ते जॅकेट घालायला मदत देखील करतात. स्पर्धक हात जोडून अमिताभ यांचे आभार व्यक्त करतो. बिग बींच्या या स्वभावाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com