Kaun Banega Crorepati 15 : KBCमध्ये ९ वर्षांनी होणार विक्रम?; UPSCचा अभ्यास कामी आला, पंजाबचा जसकरण बनला करोडपती

KBC 15 : पंजाबच्या जसकरणने १ कोटी रुपये जिंकले आहे.
KBC 15
KBC 15Saam Tv
Published On

Kaun Banega Crorepati 15 contestant To Win 7 Crore

छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमाला खूप प्रसिद्धी मिळत आहे. बुद्धीच्या जोरावर पैसे जिंकण्याचा हा कार्यक्रम प्रेक्षक रोज पाहतात. कार्यक्रमात १५व्या सीझनचा पहिला करोडपती रक्कम जिंकणारा स्पर्धक मिळाला आहे. पंजाबच्या जसकरणने १ कोटी रुपये जिंकले आहे.

अमिताभ बच्चन सुत्रसंचालन करत असलेला हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. कार्यक्रमाचा १५ सीझन सध्या सुरू आहे. पंधराव्या सीझनमध्ये अनेक स्पर्धक येऊन गेले. परंतु कोट्यवधी रुपये जिंकू शकले नाही. परंतु पंजाबच्या जसकरणने या सीझनचा पहिला रेकॉर्ड केला आहे. जसकरणने १ कोटी रुपये जिंकून आता ७ कोटींच्या प्रश्नाकडे वाटचाल केली आहे.

KBC 15
Sai Tamhankar: काही गोष्टी सोडून देता येत नाहीत... सई ताम्हणकर असं का म्हणाली? VIDEO तून मिळेल उत्तर

पंजाबमधील जसकरण हा फक्त २१ वर्षांचा आहे. जसकरण पंजाबमधील खालरा या छोट्या गावातून आला आहे. जसकरण हा UPSC परिक्षेची तयारी करत आहे. जसकरणचे सर्व क्षेत्रातून खूप कौतुक होत आहे.

सोनी टिव्हीने सोशल मीडियावर 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये प्रथम अमिताभ बच्चन बोलताना दाखवले आहे. अमिताभ बच्चन म्हणतात, 'मी आजपर्यंत खूप लोकांना करोडपती होताना पाहिले आहे. परंतु एका प्रश्नासाठी खूप लोक प्रार्थना करताना पाहिले आहे. तो म्हणजे ७ कोटी'. यानंतर जसकरणला अमिताभ बच्चन ७ कोटींचा प्रश्न विचारताना दिसत आहे. यावेळी जसकरण थोडा घाबरलेला दिसत आहे.

या प्रोमोवर खूप लोकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. जसकरण आता ७ कोटी रुपये जिंकणार का? हे पाहणं खूप उत्सुकतेच ठरणार आहे. याआधी तब्बल ९ वर्षांपूर्वी दोन भांवडांनी ७ कोटींची रक्कम जिंकली होती. आता ९ वर्षांनी हा विक्रम पुन्हा होणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com