Rashmika Mandanna: रश्मिका मंदान्ना डीपफेक व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल, दिल्ली पोलिसांनी तपास केला सुरू

Rashmika Mandanna Viral Video Case: शुक्रवारी अज्ञात व्यक्तींविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Rashmika Mandanna
Rashmika MandannaSaam TV
Published On

Rashmika Mandanna Deepfake Video:

'नॅशनल क्रश' म्हणू ओळखली जाणारी साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिक मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. यामुळे बराच गोंधळ झाला.

या डीपफेक व्हिडीओ प्रकरणी रश्मिका मंदान्नासोबत अनेक सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी केंद्र सरकार (Central Government) देखील अॅक्शन मोडमध्ये आहे. अशातच याप्रकरणी शुक्रवारी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, पोलिस विभागाने एक टीम तयार केली असून तपास सुरू केला आहे. याआधी या व्हिडिओबाबत दिल्ली महिला आयोगाने (DCW) पोलिसांना नोटीस पाठवून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती आणि उत्तरही मागितले होते. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या इंटेलिजेंस फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स युनिटवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४६५ आणि ४६९ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ सी आणि ६६ ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हायरल व्हिडिओवरील मीडिया रिपोर्ट्सची त्वरित दखल घेण्यात आली आहे. दिल्ली पोलिस आयोगाने (DCW) या संदर्भात दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. दिल्ली पोलिस आयोगाने दिल्ली पोलिसांना बजावलेल्या नोटीसनुसार, 'मिळलेल्या रिपोर्ट्सनुसार अभिनेत्रीने या प्रकरणी तिची चिंताही व्यक्त केली आहे आणि व्हिडिओमध्ये कोणीतरी तिच्या फोटोसोबत बेकायदेशीरपणे छेडछाड केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती आयोगाला मिळाली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

Rashmika Mandanna
Dunki New Poster: 'किंग खान'ने चाहत्यांना 'डंकी' स्टाइलमध्ये दिल्या दिवाळीच्या खास शुभेच्छा, चित्रपटाचे नवीन पोस्टर आऊट

त्याचसोबत दिल्ली महिला आयोगाने १७ नोव्हेंबरपर्यंत याप्रकरणाचा अहवाल मागवला आहे. आयोगाने पोलिसांना या प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरची प्रत, आरोपींचा तपशील आणि या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल १७ नोव्हेंबरपर्यंत मागितला आहे. आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्विटरवर यासंदर्भात पोस्ट केली होती.

Rashmika Mandanna
Kiran Mane Film: अतरंगी सातारकर करणार एकत्र स्क्रीन शेअर, किरण मानेसोबत दिसणार हास्यजत्रेतला ‘हा’ कलाकार

स्वाती मालीवाल यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे बनवलेल्या अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडिओची दखल घेत दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हा खोटा व्हिडीओ बनवणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी.

Rashmika Mandanna
Bigg Boss 17: 'बिग बॉस 17'च्या घरामध्ये दिवाळी धमाका, ऐश्वर्या शर्मा आणि मन्नारा चोप्रावर भडकला सलमान खान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com