Rashmika Mandanna Video: रश्मिका मंदान्ना डीपफेक व्हिडीओ प्रकरणी केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, जारी केली अ‍ॅडव्हायझरी

Rashmika Mandanna News: रश्मिकाचे हे डीप फेक व्हिडीओचे प्रकरण केंद्र सरकारने (Central Government) गांभीर्याने घेतले आहे.
Rashmika Mandanna
Rashmika MandannaSaam Tv
Published On

Central Government:

साऊथची प्रसिद्धी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) सध्या चर्चेत आहे. रश्मिका मंदान्नाचा डीप फेक व्हिडिओ (Deep Fake Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर रश्मिकाचे चाहते आणि सेलिब्रिटींकडून नाराजी व्ययक्त केली जात आहे. रश्मिकाचे हे डीप फेक व्हिडीओचे प्रकरण केंद्र सरकारने (Central Government) गांभीर्याने घेतले आहे.

या संदर्भात केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना एक सल्लागार जारी केला आहे आणि त्यांना आयटी इंटरमीडिएट नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 डी नुसार, कम्प्युटर रिसोर्सेसचा वापर करून फसवणूक केल्याबद्दल तीन वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, डीप फेक प्रकरणी एखादी तक्रार आल्यानंतर कंपन्यांना २४ तासांच्या आत कंटेंट काढून टाकावा लागतो. खरं तर, सोमवारी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी 'पुष्पा' अभिनेत्रीच्या व्हायरल झालेल्या डीप फेक व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी सांगितले होते की, अशा प्रकारची चुकीची माहिती अत्यंत हानिकारक आहे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने त्याला सामोरे जाणे आवश्यक आहे.

Rashmika Mandanna
Priyanka Chopra Don 3 Entered: ‘जंगली बिल्ली’ पुन्हा ‘डॉन’चा पाठलाग करणार; रणवीर सिंगसोबत ‘डॉन ३’मध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लची एन्ट्री?

ट्विटरवर सूचना देताना केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लिहिले की, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने कोणत्याही युजर्सद्वारे कोणतीही चुकीची माहिती पोस्ट केली जाणार नाही याची खात्री करावी आणि अशी माहिती ३६ तासांच्या आत काढून टाकली जावी. रश्मिका मंदान्नाच्या डीप फेक व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. हा व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केल्यापासून १४ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रश्मीका मंदान्नाने सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली होती. तिने ही घटना अत्यंत भयानक असल्याचे म्हटले होते. तिने या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, 'खरे सांगायचे तर हा प्रकार केवळ माझ्यासाठीच नाही तर आपल्या प्रत्येकासाठी खूप भीतीदायक आहे. तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे आज सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे.' रश्मिकाच्या डीप फेक व्हिडिओनंतर, बॉलिवूडचे महानायक यांनी याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अमिताभ बच्चन यांनी रश्मिकासोबत 'गुडबाय' चित्रपटात काम केलं आहे.

Rashmika Mandanna
Sunny Leone: सनी लिओनी लवकरच घेऊन येतेय नवा शो, 'ग्लॅम फेम'मध्ये दिसणार जजच्या भूमिकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com