दिल्ली मेट्रो अन् व्हायरल व्हिडिओ हे समिकरण काही नेटकऱ्यांसाठी नवीन नाही. दिल्ली मेट्रो असो वा दिल्लीतील बस किंवा दिल्लीतील कोणताही परिसर वादविवादांचे प्रकरण नेहमी चर्चेतच असते. कधी कपल्स आपल्या मर्यादा ओलांडताना दिसून येतात. तर कधी विचित्र असे प्रकार दिल्लीतील मेट्रोमध्ये घडताना दिसतात. अशातच दिल्ली मेट्रोमधील एका महिलेचा आणि व्यक्तीच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की, व्हिडिओतील महिला संत्पत झालीये. यानंतर या महिलेला तरुणाचा फोटो काढायचा असल्यामुळे ती तरुणाला त्याच्या चेहऱ्यावर लावलेला मास्क काढायला सांगत आहे. पण तरुण तिथून पळ काढण्याचा सतत प्रयत्न करत आहे. यामुळे या दोघांमध्ये धरपकड ही होताना दिसतेय. तरुणाच्या बाजूला असलेला लाल रगांच्या शर्टमधील व्यक्ती ही तरुणाला थांबवत आहे.
महिलेचा संताप पाहून असं वाटतंय की, तरुणाने महिलेसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला असावा. किंवा त्याची मोठी चूक नसतानाही शुल्लक कारणावरुन महिला त्याच्यावर भडकली असावी. नेमकं खरं काय हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय
सदर व्हिडिओ हा @gharkekalesh या ट्वीटर अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. दिल्ली मेट्रोतील हे वाद नेटकऱ्यांसाठी आणि मेट्रोतील प्रवाशांसाठी काही नवीन नाही. कधी महिलांमधील हाणामारीचे व्हिडिओ असतील तर कधी चक्क पुरुषांमधील हाणामारीचे व्हिडिओ असतील कायमच वेगवान अशा प्लेटफॉर्मवर तूफान व्हायरल होत असतात.
सदर व्हिडिओवर यूजर्संने मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका यूजर्सने लिहीलं आहे की,'मुलगी असल्याचा फायदा घेऊन ती स्त्रीवादी कार्ड खेळेल आणि इतरांकडून सहानुभूती मिळवेल' तर आणखी एकाने लिहीय'अशा लोकांमुळे महिलांना मेट्रोमध्येही असुरक्षित वाटते' या व्हिडिओवर महिलेच्या आणि व्यक्तीच्या बाजूने नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.