Delhi Metro Viral Video: मेट्रो ट्रेनमध्ये तरुणीने तरुणाच्या लगावली कानशिलात ; दोघांच्या हाणामारीचा VIDEO व्हायरल

Viral Video: दिल्ली मेट्रो आणि वाद हे प्रकरण काही नवीन नाही
Delhi Metro Viral Video
Delhi Metro Viral VideoSAAM DIGITAL
Published On

Delhi Metro Viral Video

दिल्ली मेट्रो आणि वाद हे प्रकरण काही नवीन नाही. दिल्ली मेट्रो ही त्यात घडणाऱ्या घटणांमुळे कायमच चर्चेत असते. सातत्याने या ट्रेनमध्ये काहीना काही घटना घडत असतात. कधी मुलांच्या स्कर्ट घालून एन्ट्रीने तर कधी कपलच्या रोमान्सने दिल्ली मेट्रो वादात सापडली आहे. अशातच सोशल मीडियावर मेट्रोमधील भांडणाचा आणखी एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Delhi Metro Viral Video
Viral Video: या दोघांनी तर गौतमीलाही मागे टाकलं; मरीन ड्राईव्हवर तरुणांचे लावणीवर ठुमके, पाहा VIDEO

व्हायरल व्हिडीओत आपल्याला दिसते की, एक तरुणी आणि मेट्रोच्या सीटवर बसलेल्या तरुणामध्ये कोणत्या तरी कारणामुळे वादावादी होत आहे. यात तरुणी उभी आहे आणि तरुण बसलेला आहे. हे भांडण ऐवढे टोकाला जाते की, तरुणी त्या तरुणावर हात साफ करते. या तरुणीला आणि तरुणाला मेट्रोमधील इतर लोक शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. तरी देखील दोघ शांत बसत नव्हते. काही वेळानंतर तरुणी शांत होते आणि मेट्रोच्या बाहेर निघून जाते.

@its_faisal_no1इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. दिल्ली मेट्रोमधील असे व्हायरल व्हिडिओ प्रकरण नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. कधी महिलांची भांडणे तर कधी तरुण- तरुणींच्या अश्लिल चाळ्याने मेट्रो चांगलीच चर्चेत आली होती. सध्या मेट्रोमधील हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. काहीं यूजर्सनी या व्हिडीओवर गंमतीदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओला लाखोच्या घरात व्हूज मिळाले आहेत. एका यूजर्सनी म्हटल की, ही 'तरुणीला शिस्त लावली पाहिजे. तर आणखी यूजर्सनी म्हटल की,'पुढील स्टेशन ,पोलीस स्टेशन' अशा अनेक प्रतिक्रिया केल्या आहेत.

Delhi Metro Viral Video
Viral Video: जन्मदात्या आईचा अमानुष छळ, डोकं आपटलं, केस ओढले अन् कानाखाली... संतापजनक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com